01 March 2021

News Flash

चाळीस हजार कोटींच्या निधीचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजणार!

या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु झाली असून ते भाजपाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

केंद्राचा ४० हजार कोटींचा निधी परत पाठवण्यासाठी फडणवीसांना बहुमत नसतानाही मुख्यमंत्री बनवण्यात आले होते असा दावा भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे. त्यानंतर या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरु झाली असून ते भाजपाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण, हा मुद्दा आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे.

खासदार हेगडेंच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना सत्तार म्हणाले, “जर महाराष्ट्राला मिळालेला निधी फडणवीसांनी केंद्राकडे परत पाठवला असेल तर हे क्लेशदायक आहे. त्यामुळे हे प्रकरण आम्ही आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडू.”

केंद्र सरकारचा ४० हजार कोटींचा निधी राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पडून असून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास ते विकासाच्या नावाखाली या निधीचा गैरवापर करतील. या निधीचा गैरवापर होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांना चार दिवसांचे मुख्यमंत्री करण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर १५ तासांमध्ये त्यांनी हा निधी पुन्हा केंद्राकडे पाठवून दिल्याचा दावा भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी कर्नाटकात एका कार्यक्रमात बोलताना केला होता. हेगडेंच्या या विधानामुळे राज्यात खळबळ उडाली असून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, हेगडेंचा हा दावा देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला असून व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड झालेल्या माहितीवर वक्तव्य करण्यापेक्षा पुराव्यानिशी बोलण केव्हाही चांगलं, अशा शब्दांत त्यांनी हेडगेंना सुनावलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 2:56 pm

Web Title: the issue of sending funds back to the center will now be held at the winter session aau 85
Next Stories
1 पंकजा मुंडे भाजपा सोडणार नाहीत – चंद्रकांत पाटील
2 खेळणीच्या दुकानाने जागा केला आमदारांतील ‘बाप’, रोहित पवारांची भावनिक पोस्ट
3 “फडणवीस यांनी खरोखर ४० हजार कोटींचा निधी परत केला असेल तर…”
Just Now!
X