News Flash

डोंबिवलीत महिलेचे घर जाळण्याचा प्रयत्न

डोंबिवली येथील कचोरे भागात झोपडपट्टी गुंडांविरुद्ध तक्रार करणाऱ्या महिलेचे घर जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात

| January 17, 2013 05:05 am

डोंबिवली येथील कचोरे भागात झोपडपट्टी गुंडांविरुद्ध तक्रार करणाऱ्या महिलेचे घर जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या प्रकरणी चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कचोरे येथील न्यू गोविंदवाडी परिसरात रजनी यादव यांची (४५) यांची झोपडी आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गुंड नरसिंग गायसमुद्रे (४२) यादव यांच्याकडे वारंवार ३० हजारांची खंडणी मागत होता. यामुळे त्रस्त झालेल्या यादव यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. हाच राग मनात ठेवून बुधवारी दुपारी यादव या कामानिमित्त बाहेर गेल्या असताना चौघा तरुणांनी त्यांची झोपडी जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने झोपडीत असलेली यांदव यांची मुलगी मीना (१३) हिच्या हा प्रकार लक्षात आला आणि तिने बाहेर धाव घेऊन स्वत:चा जीव वाचवला. आजूबाजूच्या लोकांनी त्वरीत आग आटोक्यात आणली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 5:05 am

Web Title: tried to fire of ladies house in dombivali
टॅग : Fire
Next Stories
1 बारावीच्या वेळापत्रकाबाबत आज निर्णय होणार?
2 महाराष्ट्रातील उद्योगांना चांगला वीजपुरवठा
3 साहित्य संमेलनात दीड कोटींची पुस्तकविक्री
Just Now!
X