लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने होळीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी यापूर्वी ११२ होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा केली होती. आता सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता आणखी १२ होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. मुंबई आणि पुण्यावरून दाणापूर, गोरखपूर, छाप्रा येथे रेल्वेगाड्या जाणार आहेत. तसेच काही विशेष गाड्यांना नागपूर येथे थांबा दिला आहे.

Megablock, Central Railway,
रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
sale of scrap, Western Railway,
पश्चिम रेल्वेला भंगार विक्रीतून ४६९ कोटींची कमाई
Mumbai Municipal Corporation, bmc, Railway Officials, Conduct Joint Inspection, railway and bmc Joint Inspection, Prevent Monsoon Waterlogging, waterloggig on train track, waterlogging on mumbai road,
रेल्वे रुळांवर पाणी साचू नये म्हणून खबरदारी, पश्चिम, मध्य रेल्वे स्थानकांवर महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त पाहणी

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते दाणापूर विशेष दोन फेऱ्या धावणार आहेत. गाडी क्रमांक ०१२१५ विशेष रेल्वेगाडी २१ मार्च रोजी सकाळी ११.२५ वाजता सीएसएमटीवरून सुटेल. गाडी क्रमांक ०१२१६ विशेष रेल्वेगाडी २२ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता दानापूर येथून सुटेल. या रेल्वेगाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन आणि बक्सर येथे थांबतील.

आणखी वाचा- निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान’च्या जाहिराती हटणार; एसटी बसवरील राजकीय जाहिराती काढल्या जाणार

गाडी क्रमांक ०१०८३ सीएसएमटी ते गोरखपूर २२ मार्च रोजी रात्री १०.३५ वाजता सीएसएमटीवरून सुटेल. गाडी क्रमांक ०१०८४ गोरखपूर ते सीएसएमटी २४ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता गोरखपूरवरून सुटेल. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओराई, कानपूर, लखनौ, गोंडा आणि बस्ती येथे थांबतील.

गाडी क्रमांक ०१४७१ पुणे ते दाणापूर अतिजलद विशेष रेल्वेगाडी पुणे येथून २१ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०१४७२ दाणापूर ते पुणे अतिजलद विशेष रेल्वेगाडी दाणापूर येथून २२ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता सुटेल. या रेल्वेगाडीला हडपसर (फक्त पुणे ते दाणापूरसाठी) , दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा येथे थांबतील.

आणखी वाचा- ‘उन्हाळ्याची सुट्टी असली तरी गाफील राहू नका’, उद्धव ठाकरेंचं मराठी मतदारांना आवाहन

गाडी क्रमांक ०१४३१ पुणे ते गोरखपूर विशेष रेल्वेगाडी पुणे येथून २२ मार्च रोजी दुपारी ४.१५ वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०१४३२ गोरखपूर ते पुणे विशेष रेल्वेगाडी गोरखपूर येथून २३ मार्च रोजी रात्री ११.२५ वाजता सुटेल. या रेल्वेगाडीला दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओराई, कानपूर, लखनौ, गोंडा, मानकापूर, बस्ती आणि खलीलाबाद येथे थांबतील. गाडी क्रमांक ०५१९४ पनवेल ते छाप्रा विशेष रेल्वेगाडी २२ आणि २९ मार्च रोजी रात्री ९.४० वाजता पनवेल येथून सुटेल. गाडी क्रमांक ०५१९३ छाप्रा ते पनवेल विशेष रेल्वेगाडी २१ आणि २८ मार्च रोजी दुपारी ३.२० वाजता छाप्रा सुटेल. ही रेल्वेगाडी कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, बनारस, वाराणसी, गाझीपूर शहर आणि बलिया येथे थांबेल. या सर्व गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कासह संगणकीकृत आरक्षण केंद्रावर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होईल. तसेच गोरखपूर- महबूबनगर, छपरा- सिकंदराबाद, महबूबनगर – गोरखपूर, सिकंदराबाद – छाप्रा या रेल्वेगाडीला नागपूर येथे थांबा देण्यात आला आहे.