ठाकरे गटाने बनावट प्रतिज्ञापत्र तयार केल्याचा आरोप

मुंबई : परभणीमधील शिंदे गटातील कार्यकर्त्यांने केलेल्या तक्रारीच्या आधारे अंधेरी पोलिसांनी बनावट प्रतिज्ञापत्राप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार व इतर कार्यकर्त्यांच्या नावाने १०० रुपयांचे मुद्रांक दस्त (स्टँप पेपर) खरेदी करून बनावट प्रतिज्ञापत्र तयार केल्याचा आरोपकरण्यात आला आहे. तसेच ती बनावट प्रतिज्ञापत्रे ठाकरे गटाला पाठींबा देण्यासाठी वापरण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारदार संदीप हरिभाऊ लहाने (३६) परभणी येथील रहिवासी असून ते २०१० पासून २०२० पर्यंत सेलू नगरपरिषदेत नगरसेवक होते. सध्या ते बाळासाहेबांची शिवसेना या शिंदे गटातील सक्रिय कार्यकर्ते आहेत. बनावट प्रतिज्ञापत्रप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केल्याचे त्यांना वर्तमानपत्रातील वृत्त व समाज माध्यमांवरील संदेशातून समजले. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी अंधेरी पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनुसार जुलै २०२२ मध्ये परभणीतील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे गटाला पाठींबा असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यातील १०० रुपयांचे मुंद्रांक दस्त तक्रारदार लहाने यांचे नाव नोंदणी करून खरेदी करण्यात आल्याचे त्यांना समजले.विक्रेत्याकडे जाऊन त्यांनी पडताळणी केली असता तक्रारदार व अन्य सहा कार्यकत्यांच्या स्वाक्षऱ्या करून ते खरेदी करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली.