मुंबई: पतीने खरेदी केलेल्या घराचा ताबा देण्याऐवजी शिक्षिकेची बोळवण करून विकासकाने १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मुलुंडमध्ये घडला. इतकेच नव्हे तर पैसे भरलेले असतानाही शिक्षिकेऐवजी भलत्यालाच घराचा ताबा देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत शिक्षिकेने नवघर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मुलुंड परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीमधील शिक्षिका प्रतीक्षा मदने (४५) यांच्या पतीने घर पाहिले होते. विकासकाने या घराची १९ लाख रुपये किंमत सांगितली होती. प्रतीक्षा यांच्या पतीने विकासकाला १३ लाख रुपये रोख दिले होते. उर्वरित रक्कम ताबा मिळाल्यानंतर देण्यात येणार होती. मात्र अचानक २०१४ मध्ये प्रतीक्षा यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर प्रतीक्षा यांनी उर्वरित रक्कम भरून घराचा ताबा घेण्यासाठी विकासकाची भेट घेतली. तसेच प्रतीक्षा यांच्या पतीने पाहिलेल्या घरात अन्य कुटुंब वास्तव्यास असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या संदर्भात प्रतीक्षा यांनी विकासकाकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांची बोळवण केली.

हेही वाचा… मुंबई: कंत्राटी सफाई कामगारांच्या पगारातून पैसे कापले, १५ दिवसांत २२८ कोटी भविष्य निर्वाहनिधीत जमा करण्याचे पालिकेला आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर घराचा ताबा द्यावा अन्यथा भरलेले पैसे परत करावे अशी मागणी त्यांनी विकासकाकेड केली. मात्र विकासक टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विकासकाविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.