मुंबईः लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने तीन वर्षांच्या मुलीला बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाविरोधात आरे पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. आरोपी मुलाची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आली आहे.

हेही वाचा – जंजिरा किल्ल्याला जोडणाऱ्या जेट्टीच्या कामाला अखेर सुरुवात, जून २०२४ पासून किल्ल्यावर वाट होणार सुकर

हेही वाचा – “पंतप्रधान मोदींना भेटल्यावर उद्धव ठाकरेंची इच्छा होती की…”; अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडित मुलगी तीन वर्षे १० महिन्यांची आहे. आरोपीने ऑगस्टमध्ये पीडित मुलीला लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने बोलावून अश्लील कृत्य केले होते. त्यानंतर ९ ऑक्टोबरला पुन्हा आरोपीने खेळण्यासाठी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुरुवारी गुन्हा दाखल केला. आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.