दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, ईडीच्या या कारवाईनंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत असताना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी कारवाईवरून मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे. विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा- “मनसेच्या वाट्याला गेलात आणि मुख्यमंत्रीपद गेलं”, राज ठाकरेंच्या टोल्यावर संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “तुमचा पक्ष…!”

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

“देशभरातील विरोधकांवर तसेच जी लोक सरकारच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावर अशा कारवाई होत आहे. अशा कारवायांना आम्ही घाबरत नाही आणि घाबरण्याची गरजही नाही, कारण सरकारला आमची भीती वाटते. आम्ही सगळे ‘इंसाफ के सिपाई’ म्हणून आम्ही लढत आहोत. असे प्रकार आता देशभरात सुरू आहेत. त्यामुळे देशात राजकीय स्वातंत्र आणि लोकशाही जिवंत आहे का? असा प्रश्न पडतो”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच २०२४ ची निवडणूक ही या देशातील शेवटची निवडणूक ठरेल, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, “गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरेंसह देशभरातील विरोधाकांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले होते. इथे महाराष्ट्रातही ज्यांनी गद्दारी केली. त्यांच्याविरोधातील प्रकरणं आता शांत झाली आहेत. जे लोक आमच्या बरोबर आहेत, त्यांच्याविरोधात खोटी तडीपारीची नोटीस आणि खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. अशा प्रकारे कोणतंही राज्य चालू शकत नाही.”

हेही वाचा – VIDEO: “खत हवं असेल, तर जात सांगा”, जयंत पाटलांचा हल्लाबोल, म्हणाले, “शेतकऱ्याला त्याची…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही”

दरम्यान, राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांना खतं खरेदी करण्यासाठी जात विचारली जात असल्याची घटना उघडकीस आली आहे, यासंदर्भातही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “देशात आणखी किती वाद निर्माण करायचे, हे आता सरकारने ठरवले पाहिजे. आम्ही कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. कदाचित केंद्र सरकारला यातून माहिती गोळा करायची असेल. पण हे सर्व होत असताना ज्याला हिंदुस्थानी म्हणून आपली जात लिहायची आहे, ते तसही लिहू शकतात”, असे ते म्हणाले.