मुंबई : यंदा आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी एसटीने पंढरपुरात दाखल झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळातर्फे १५ ते २१ जुलैदरम्यान सुमारे पाच हजार विशेष बस सोडल्या होत्या. या पाच हजार बसच्या १९ हजार १८६ फेऱ्यांमधून ९ लाख ५३ हजार भाविक – प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला. यातून एसटीला २८ कोटी ९२ लाख रुपये उत्पन्न मिळाले.

हेही वाचा : मुंबई: पश्चिम रेल्वेवर शनिवारी, तर मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागांतून बसचे नियोजन करण्यात आले होते. एसटी महामंडळाने वारकऱ्यांसाठी तब्बल पाच हजार बसगाड्या चार वेगवेगळ्या तात्पुरत्या बसस्थानकांवर तैनात केल्या होत्या. त्याबरोबरच थेट पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष बस सोडल्या होत्या. यात्रेपूर्वी दोन दिवस वाखरी येथील संपन्न झालेल्या रिंगण सोहळयासाठी एसटीकडून २०० बस उपलब्ध करण्यात आल्या होत्या, अशी माहिती विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी दिली.