लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने १७ मार्चपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते फ्री प्रेस हाऊस (नरिमन पॉइंट) दरम्यान नवीन वातानुकूलित बसमार्ग क्रमांक ‘ए-१००’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग – हुतात्मा चौक –अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट) – हुतात्मा राजगुरू चौक (मंत्रालय) – फ्री प्रेस जर्नल मार्ग – फ्री प्रेस हाऊस असा या बसचा मार्ग आहे.

आणखी वाचा- म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२३: ‘प्रथम प्राधान्य’ योजनेतील घरांसाठी उद्यापासून अर्ज विक्री- स्वीकृती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीएसएमटी येथून पहिली बस सकाळी ८ वाजता, तर शेवटची बस रात्री ८.४५ वाजता सुटेल. फ्री प्रेस हाऊस येथून पहिली बस सकाळी ८.१५ वाजता, तर शेवटी बस रात्री ९ वाजता सुटेल. या बसमार्गावर सोमवार ते शनिवार (सार्वजनिक सुट्टीसह) बस धावणार आहे. प्रवाशांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.