मुंबई : यंदा गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेने आतापर्यंत २०२ गणपती विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे. आता आणखीन २० गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण २२२ गणपती विशेष रेल्वेगाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. विशेष २० गाड्यांचे आरक्षण ७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्यांच्या आठ फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०१०३१ एलटीटी येथून ६ सप्टेंबर, ७ सप्टेंबर, १३ सप्टेंबर आणि १४ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०३१ विशेष गाडी रत्नागिरी येथून ७,८,१४,१५ सप्टेंबर रोजी सकाळी ८.४० वाजता सुटेल आणि एलटीटी येथे त्याच दिवशी सायंकाळी ५.१५ वाजता पोहोचेल.

हेही वाचा : मुंबई: गुंगीचे औषध देऊन १४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार

पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडीच्या चार फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०१४४३ पनवेल येथून ८, १५ सप्टेंबर रोजी पहाटे ४.४० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४४४ रत्नागिरी येथून ७, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी रात्री १.३० वाजता पोहोचेल.

हेही वाचा : आनंदाचा शिधाप्रकरणी राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दिलासा, निविदेतील अटींना आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या दोन फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०१४४१ पनवेल येथून ११ सप्टेंबर रोजी पहाटे ४.४० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता पोहचेल. गाडी क्रमांक १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५० वाजता रत्नागिरी येथून सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी रात्री १.३० वाजता पोहचेल. तसेच पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या सहा फेऱ्या धावतील. या सर्व गणपती विशेष रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण ७ ऑगस्ट रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर विशेष शुल्कावर सुरू होईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.