मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. ही सदिच्छा भेट असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले असले तरी मुंडे यांची नाराजी दूर करण्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>> VIDEO : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ठाकरे गट – शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, पोलीस पथक घटनास्थळी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीला कंटाळून दोन महिने सुटीवर जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. या काळात राज्यातील अनेक मोठी देवस्थाने, साडेतीन शक्तिपीठे, ज्योतिर्लिग आदी ठिकाणी जाऊन पंकजा मुंडे यांनी दर्शन घेतले होते आणि जनसामान्यांची भेटही घेतली होती. पुढील काळात राजकीय वाटचाल कशी करायची, याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी मुंडे यांची याआधाही दोन वेळा भेट घेऊन चर्चा केली होती.