अमृता फडणवीसांनी मुंबईतील तीन टक्के घटस्फोट हे इथल्या ट्रॅफिकच्या समस्येमुळे होत असल्याचं विधान केलं आणि त्यांच्या या विधानावरून जोरदार कलगीतुरा रंगू लागला आहे. मंत्री आदित्य ठाकरेंनी अमृता फडणवीसांच्या वक्तव्याला कॉमेडी म्हटलं तर आपण सर्वेक्षणातून समोर आलेली आकडेवारी सांगत असल्याचं अमृता फडणवीस म्हणाल्या. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी अमृता फडणवीसांना टोला लगावल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंना त्यांची ‘दिशा’ चुकत असल्याचं म्हटलंय.

“आदित्य’जी तुमची ‘दिशा’ चुकतीये.  अमृता फडणवीसांवर टिका करण्यापेक्षा तुमच्या पेंग्विनप्रेमामुळे चुराडा झालेल्या जनतेच्या पैशाचा हिशोब द्या. राठोड, राऊत, परब सारख्या पात्रामुळे शिवसेना‘हास्य जत्रा’बनलीये. कितीही वैयक्तिक हल्ले केले तरी आम्ही घाबरणार नाही..‘चला.. हवा येऊ द्या..’,” असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप
sanjay raut raj thackeray amit shah
“राज ठाकरेंची खंत फक्त मलाच माहिती”, अमित शाहांच्या भेटीवर संजय राऊतांची खोचक टिप्पणी; ‘त्या’ व्हिडीओचा केला उल्लेख

दरम्यान, चित्रा वाघ यांनी अप्रत्यक्षपणे दिशा पटानीचं नाव घेत आदित्य ठाकरेंवर टीका केल्याची चर्चा त्यांच्या या ट्वीटनंतर सुरू झाली आहे. ट्वीटमध्ये पुढे त्या म्हणतात की, तसेच संजय राठोड, संजय राऊत आणि अनिल परब यांच्यासारख्या नेत्यांमुळे शिवसेना हास्यजस्त्रा बनली आहे, असं म्हणत कितीही वैयक्तिक हल्ले केले तरी आम्ही घाबरणार नाही.

“छोटे राजा साहेब, यापेक्षा मोठी कॉमेडी…;” आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याला अमृता फडणवीसांचं प्रत्युत्तर

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस –

“मी एक सामन्य नागरिक म्हणून बोलत आहे. मी बाहेर निघते तेव्हा मला किती वाहतूक कोंडी होते हे दिसतं, खड्ड्यांनी आम्हाला किती त्रास होतो हे दिसतं. मुंबईत वाहतूक कोडींमुळे घटस्फोट होण्याचं प्रमाण तीन टक्के आहे. कारण आपण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही”, असं त्या म्हणाल्या होत्या. मात्र नंतर, “सर्वे मंकीच्या सर्वेक्षणातील निरीक्षणांवरूनच मी हे विधान केलं”, असा खुलासा अमृता फडणवीस यांनी केला होता.

अमृता फडणवीसांच्या ‘ट्रॅफिकमुळे घटस्फोट’ विधानावर आदित्य ठाकरेंचा टोला; म्हणाले, “आपण कॉमेडी…”!

आदित्य ठाकरेंचा टोला –

ट्रॅफिकमुळे घटस्फोट होत असल्याच्या अमृता फडणवीसांच्या विधानावर आदित्य ठाकरेंनी खोचक निशाणा साधला. या विधानाविषयी विचारणा केली असता “मला वाटतं कॉमेडी आपण टीव्हीसाठी ठेवू. राजकीय मंडळी म्हणून आपण जे समाजकारण करत असतो, तेच आपण करत राहू”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. याआधी शिवसेनेकडून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील अमृता फडणवीस यांच्या या विधानावर टीका करताना “त्यांच्या या विधानावर हसावं की रडावं हेच कळत नाही”, असं म्हटलं होतं.