लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: कोणत्याही रस्त्याच्या कोपऱ्यात, कुठेही साठलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याची पालिकेकडे ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. या तक्रारीनंतर घनकचरा विभागाकडून त्वरित तेथील कचरा उचलला जाईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आजपासून म्हणजेच सोमवार दिनांक ५ जूनपासून ही सेवा कार्यान्वित होणार आहे.

baobab tree, angry environmentalists,
३०० वर्ष जुन्या बाओबाब झाडाची कत्तल, संतप्त पर्यावरणप्रेमी उद्या शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणार
139 passengers died after falling from the local train in three months
लोकलमधून पडून तीन महिन्यांत १३९ बळी ; रखडलेले प्रकल्प, मर्यादित फेऱ्यांमुळे जीवघेण्या प्रवासाची वेळ
BMC Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती! ९० हजारपर्यंत मिळू शकतो पगार
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे

सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना नोंदवता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ८१६९६८१६९७ हा व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

हेही वाचा… सीरमची लस, कंपनीची बदनामी करणारी वक्तव्ये हटवा

या क्रमांकावर नागरिकांना “कचरा न उचलणे, रस्ता स्वच्छ नसणे व मृत जनावरे उचलणे” या तक्रारीसंबंधीचे थेट छायाचित्र पाठवता येणार आहे. नागरिकांनी छायाचित्रासह, त्या ठिकाणाचा पत्ता, जीपीएस लोकेशन देणे आवश्यक आहे.

हेही वाचा… समूह पुनर्विकासासाठी अधिमूल्यात ५० टक्के सवलत का महत्त्वाची?

व्हॉट्सॲप चॅटबॉटवर केलेली तक्रार संबंधित विभागाकडे थेट जाणार आहे. तक्रार निर्मुलनाकरीता सध्या लागणारा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. घनकचरा व्यवस्थापन अधिकारी या तक्रारीचे त्वरित निर्मूलन करुन, त्या ठिकाणचे छायाचित्र अपलोड करणार आहेत. त्यामुळे येत्या काळात मुंबई खरोखरच स्वच्छ सुंदर दिसेल अशी अपेक्षा आहे.