राज्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे, परंतु निधी वाटपात काँग्रेसवर अन्याय होत असल्याची भावना त्या पक्षाचे मंत्री, आमदारांमध्ये आहे. तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचे विभाग व आमदारांना निधीचे समान वाटप झाले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे मंत्री व वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

काँग्रेसच्या मंत्र्यांकडील विभागांना पुरेसा निधी मिळत नाही, तसेच आमदारांच्या विकास कामांच्या निधी वाटपातही असमानता असते, त्याबद्दल पक्षात  नाराजी आहे. या संदर्भात गुरुवारी सायंकाळी काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजिनक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, महिला व बालकल्याण मंत्री अड. यशोमती ठाकूर, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आदी नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचे विभाग तसेच आमदारांना समान निधीचे वाटप करण्यात यावे, अशी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

‘राऊत यांच्या आरोपांची चौकशी करा’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या व इतर भाजप नेत्यांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. राज्य सरकारने पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून त्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे पटोले यांनी सांगितले.