कंत्राटदाराला पालिके ची नोटीस; काम लवकर पूर्ण न झाल्यास दंड करण्याचा इशारा
मुंबई : पालिकेच्या रुग्णालयांमध्ये १६ प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यास विलंब केल्याप्रकरणी पालिकेने संबंधित कं त्राटदाराला नोटीस पाठवली आहे. सुमारे ८४ कोटी रुपयांचे कंत्राट दिलेल्या कंपनीला हे प्रकल्प उभारण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र मुदत उलटून गेली तरी काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे लवकर काम पूर्ण न झाल्यास दंड वसूल करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने कंपनीला दिला आहे.

करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून रुग्णांवर उपचारांसाठी आवश्यक असलेला वैद्यकीय प्राणवायू उपलब्ध करण्यासाठी पालिके च्या नऊ रुग्णालयांमध्ये १६ ठिकाणी प्राणवायू प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या कामासाठी हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. या कं पनीच्या कामाविषयी आधीच तक्रारी करण्यात आल्या होत्या. तसेच या कंपनीची निवड ज्या पद्धतीने झाली त्यावरूनही वाद  झाला होता. मात्र या निवड प्रक्रियेत काहीही त्रुटी नसल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर के ले होते. आधीपासून वादग्रस्त ठरलेल्या या कं पनीला वेळेत प्रकल्प पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे नवीनच वाद निर्माण झाला आहे. ३० दिवसांत प्रकल्प उभारता न आल्यामुळे पालिका प्रशासनाने आता कं पनीला नोटीस पाठवली आहे व दंड करण्याचा इशारा दिला आहे.

प्राणवायू प्रकल्पाबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या ९ जूनच्या बैठकीत मंजूर झाला होता. त्यानंतर १४ जूनला कं त्राटदाराला कार्यादेश देण्यात आले होते. त्यानंतर १६ जून प्रकल्प उभारणी करावयाच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. २५ जूनपर्यंत सर्व १६ प्रकल्पांच्या जांगाचे हस्तांतरण करण्यात आले.  तसेच योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी संबंधित पुरवठादारांकडून अर्ज देखील करण्यात आले. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र २५ जुलैला हा कालावधी संपल्यानंतरही हे प्रकल्प सुरू झालेले नाहीत. त्यामुळे प्रशासनाने आता कं पनीला नोटीस पाठवली आहे. प्रकल्पाला उशीर झाल्यास दंडात्मक कारवाईबरोबरच कं त्राटातील तरतुदींनुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या रुग्णालयांत प्रकल्प

मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय, अंधेरीतील कूपर रुग्णालय, कु र्ला भाभा, अंधेरीचे व्ही. एन. देसाई रुग्णालय, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, के ईएम रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय, जी. टी. बी. रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय या नऊ रुग्णालयांत हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या १६ प्राणवायू प्रकल्पांपासून महापालिका रुग्णालयात २३ हजार ६४० लिटर प्रतिमिनिट एवढ्या प्राणवायूची निर्मिती होणार आहे.