गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा (अलिबाग) दरम्यानचा जलप्रवास आता महागला आहे. जलप्रवासी वाहतुकीच्या दरात १५ ते २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याच बरोबर मुंबईहून एलिफंटा दरम्यानच्या आरामदायी जलवाहतुकीच्या दरात १० टक्के वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने सुधारीत दरपत्रकांची घोषणा केली आहे.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडीया ते अलिबाग तालुक्यातील मांडवा दरम्यान जलप्रवासी वाहतूक केली जाते. दरवर्षी जवळपास १० लाख प्रवासी या जलवाहतूक सेवेचा लाभ घेत असतात. या प्रवासी सेवेसाठी पूर्वी १४५ ते १९५ रुपयांचा दर आकारला जात होता. यात २० रुपये प्रवासी कर आणि ५ रुपये सुरक्षा कराचा समावेश होता. आता मात्र या जलवाहतुकीसाठी १६५ ते २१५ रुपये मोजावे लागणार आहेत. तिकिट दरांत १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. तर मुंबईहून एलिफंटा बेटावर जाणाऱ्या डिलक्स बोटींच्या दरात १५ ते २० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जाणून घ्या कशी आहे दरवाढ

  • मुंबईते मांडवा (अलिबाग)

पूर्वीचा दर हा १४५ ते १९५ रुपयांच्या घरात होता या दरांमध्ये आता २५ रुपयांची वाढ झाली आहे

त्यामुळे आता मुंबई ते अलिबाग बोटीने प्रवास करण्याचं तिकिट हे आता १६५ ते २१५ रुपयांचे असणार आहे

  • गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा

गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटा बेटावर जाणाऱ्या डिल्कस बोटींचे तिकिट दर १५ ते २० रुपयांनी महाग झाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gate way of india to mandwa boat ticket rates increased scj
First published on: 03-03-2020 at 17:18 IST