मुंबई : पै-पै जोडून भविष्याची तजवीज गुंतवणुकीतून केली जाते. ही गुंतवणूकच आपल्याला जगताना आधार देते आणि आपल्यानंतर कुटुंबीयांना या गुंतवणुकीचा परतावा मिळवून देण्याचा आदर्श मार्ग म्हणजे इच्छापत्र! ते का करायये? कसे करायचे? कोणती काळजी घ्यायची? अशा अनेक प्रश्नांची सुलभ उत्तरे रविवारी सायंकाळी मुलुंडमध्ये आयोजित ‘लोकसत्ता अर्थभान’ या गुंतवणूकपर संवादातून मिळविता येतील.
गुंतवणूक साक्षरतेचा भाग म्हणून होत असलेल्या या कार्यक्रमाचे ‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ मुख्य प्रायोजक आहेत. हा कार्यक्रम रविवार, ८ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता, महाराष्ट्र सेवा संघ सभागृह, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, अपना बाजारच्या वर, मुलुंड (प.) येथे होत आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, उपस्थितांना या कार्यक्रमात इच्छापत्र आणि गुंतवणूक नियोजनाविषयी त्यांच्या प्रश्न व शंकांचे निरसन करता येईल.
आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या संपत्तीचे वाटे कसे व्हावेत याचा निर्णय हयातीतच घेण्यास ‘इच्छापत्र’ मदतकारक ठरते. संपत्ती व्यवस्थापनात म्हणूनच अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘इच्छापत्रा’संबंधाने परिपूर्ण माहिती या विशेष सत्रात सनदी लेखापाल आणि सल्लागार दीपक टिकेकर हे देतील. त्याचप्रमाणे थोड्याथोडक्या बचतीतून इच्छित संपत्ती निर्माण शक्य आहे. पारंपरिक बँक ठेवींव्यतिरिक्त, सोने, म्युच्युअल फंड, शेअर बाजारातील गुंतवणुकीचे मर्म या कार्यक्रमात सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार तृप्ती राणे समजावून सांगतील.
हेही वाचा >>> विशेष अधिवेशन आजपासून: नव्या सदस्यांना शपथ, सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवड
कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल.
● इच्छा पत्र का, कसे, कशासाठी?
– दीपक टिकेकर (सनदी लेखापाल व सल्लागार)
● गुंतवणुकीद्वारे अर्थनियोजन
तृप्ती राणे (सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)
लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
कुठे : महाराष्ट्र सेवा संघ सभागृह, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, अपना बाजारच्या वर, मुलुंड (प.)
कधी : रविवार, ८ डिसेंबर २०२४, सायंकाळी ६.१५ वाजताअस्वीकरण : म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.