मुंबई : पनीरऐवजी चीज ॲनालॉगचा वापर करण्यात येत असल्याचे उघडकीस आल्यानंतर मुंबईतील मॅकडोनाल्डच्या १३ उपहारगृहांसह फास्टफूडची विक्री करणाऱ्या अन्य नामांकित १७ उपहारगृहांना अन्न व औषध प्रशासनाने नोटीस पाठविली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या उपहारगृहांची साखळी असलेल्या कंपन्यांविरोधात फौजदारी कारवाई करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ऑल फूड ॲण्ड लायसन्स होल्डर फाऊंडेशनने वैद्यकीय शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय आणि मुंबई पोलिसांना पत्र पाठवून केली आहे.

मॅकडोनाल्ड ही जागतिक स्तरावरील फास्ट-फूड खाद्यपदार्थांची प्रसिद्ध साखळी आहे. लाखो ग्राहक दररोज मॅकडोनाल्डमध्ये खाद्यपदार्थ खाण्यासाठी गर्दी करतात. मॅकडोनाल्डमध्ये पनीरऐवजी चीज ॲनालॉगचा वापर करून ग्राहकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने मुंबईसह राज्यातील मॅकडोनाल्डच्या उपहारगृहांची तपासणी केली. या तपासणीनंतर मुंबईतील १३ उपहारगृहांमध्ये सुधारणा करण्याची नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, मॅकडोनाल्डमध्ये ग्राहकांची फसवणूक होत असल्याने त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारे पत्र ऑल फूड ॲण्ड लासन्सस होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी वैद्यकीय शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय आणि मुंबई पोलिसांना पाठविले आहे.

हेही वाचा : …अन् मुंबईतील सिग्नल यंत्रणेवर दिसू लागले चक्क मराठी आकडे; पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अन्नामध्ये भेसळ करणे, ग्राहकांची फसवणूक करणे व विश्वासार्हतेचे उल्लंघन करणे हा भारतीय दंड संहिता कलम २७२, २७३, ३४, ४२० आणि ४०६ नुसार गुन्हा आहे. त्यामुळे मॅकडोनाल्डविरोधात फौजदारी कारवाई करून गुन्हा दाखल करावा. तसेच मॅकडोनाल्डच्या सर्व उपहारगृहांची सखाेल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.