scorecardresearch

Premium

मुंबई : वाहतुक पोलिसाच्या डोक्यात मारले हेल्मेट, आरोपीला अटक

आरोपीवर दंडात्मक कारवाई केली असता आरोपीला राग आला. त्याने हातातील हेल्मेट वाहतुक पोलिसाच्या डोक्यात मारले.

mumbai traffic police, traffic police hit with helmet, driving licence traffic police, mumbai man hit traffic police
मुंबई : वाहतुक पोलिसाच्या डोक्यात मारले हेल्मेट, आरोपीला अटक (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : विनापरवाना दुचाकी चालवल्यामुळे वाहतुक पोलिसांनी कारवाई केली असता दुचाकीस्वाराने पोलिसाच्या डोक्यात हेल्मेट मारल्याचा प्रकार रविवारी शीव परिसरात घडला. याप्रकरणी वाहतुक पोलिसाच्या तक्रारीवरून शीव पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी दुचाकीस्वाराला अटक केली आहे. तौसिफ अब्दुल माजिद खान (२७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो कुर्ला एलबीएस रोडवरील शीतल चित्रपटगृहाजवळ राहतो. आरोपी शीव परिसरातील माटुंगा वाहतुक पोलीस चौकी जवळील सिग्नलवर असताना हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आनंद शेजवळ (४२) हे माटुंगा वाहतुक शाखेत कार्यरत आहेत. ते चौकीजवळील सिग्नलवर वाहतुक नियमनासाठी कार्यरत असता एक तरूण दुचाकीवरून येत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी दुचाकीस्वाराकडे परवाना मागितला. पण त्याच्याकडे चालक परवाना नव्हता. त्यामुळे त्यांनी आरोपीवर दंडात्मक कारवाई केली असता आरोपीला राग आला. त्याने हातातील हेल्मेट वाहतुक पोलिसाच्या डोक्यात मारले व तेथून पळण्याचा प्रयत्न करू लागला.

israel war hamas terrorist
“ना मोहीम, ना गोळीबार…हे युद्ध आहे”, हमासच्या हल्ल्यानंतर नेतान्याहूंनी ठणकावलं; म्हणाले, “त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी…!”
navi mumbai nmmt bus, nmmt bus catches fire, traffic police and bus driver, bus driver helped to extinguish fire
एन.एम.एम.टी बसच्या टायरने पेट घेतला, बस चालकाचे प्रसंगावधान आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीमुळे अनर्थ टळला…
mumbai police, sub inspector attacked with blade, mumbai police attacked with blade
मुंबई : पोलीस उपनिरीक्षकावर ब्लेडने हल्ला
crime pune
रस्त्याच्या कडेला आढळला डान्स बारमधील तरुणीचा मृतदेह, तपासानंतर समोर आलं धक्कादायक कारण

हेही वाचा : विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पण वाहतुक पोलिसाने मोठ्या शिताफीने त्याला घटनास्थळावरच ताब्यात घेतले. त्यानंतर शीव पोलीस ठाण्यात नेऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. भादंवि कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा निर्माण करणे) व ३३२ (सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणे) आदी कलमांतर्गत शीव पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्याला याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In mumbai man hit traffic police with helmet when asked for driving licence mumbai print news css

First published on: 25-09-2023 at 16:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×