मुंबई : मुंबईत शुक्रवारी ३२.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. असे असले तरीही मुंबईकरांना शुक्रवारी असह्य उकाड्याचा सामना करावा लागला. तापमानाचा पारा कमी असतानाही पारा चढा असल्यासारखे वाटत होते. दरम्यान, पुढील एक- दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३० अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रांवरील तापमान सरासरी इतकेच असतानाही वाढलेल्या आर्द्रतेमुळे शुक्रवारी उकाड्याचा सामना करावा लागला. दरम्यान, उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारवा निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानाच्या पाऱ्यात वाढ झाली होती. मात्र, शुक्रवारी राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात घट झाली असून पुढील एक – दोन दिवसांत यात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हेही वाचा : वीजदरवाढ तूर्तास टळली, ‘डीसल्फरायझेशन’ची सक्ती दोन वर्षे लांबणीवर गेल्याने दिलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात काही भागात शनिवारी हलक्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामध्ये ठाणे, नाशिक, परभणी, बीड, अहिल्यानगर आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित भागात दिवसभर ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.