मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरूवारी दादर येथील शिवाजी पार्कमध्ये सभा होणार आहे. या सभेसाठी दादर परिसरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात येणार आहेत. परिसरातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर वाहतूक पोलिसांनी १४ मार्गांवर वाहने उभी करण्यास प्रतिबंध केला आहे.

महायुतीच्या सभेसाठी पश्चिम व पूर्वी महामार्गावरून अनेक वाहन सभेच्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. या सभेमुळे मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत दादर आणि आसपासच्या परिसरातील १४ मार्गावरून होणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यासाठी वाहतूकधारांना पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आले आहेत.

हेही वाचा : खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा हवेतच ! जाणून घ्या, एका वर्षात किती खाद्यतेलाची आयात झाली आणि त्यासाठी किती रुपये मोजले

वाहने उभी करण्यास प्रतिबंध असलेले मार्ग

  • स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वरळीकर चौक (सेंच्युरी जंक्शन) ते हरिओम जंक्शनपर्यंत
  • केळूस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर, शिवाजी पार्क, दादर.
  • एमबी राऊत मार्ग, शिवाजी पार्क, दादर
  • पांडुरंग नाईक मार्ग (रोड क्रमांक ५) शिवाजी पार्क, दादर
  • दादासाहेब रेगे मार्ग, शिवाजी पार्क, दादर
  • लेप्टिनेंट दिलीप गुप्ते मार्ग, शिवाजी पार्क गेट नंबर – ४ शीतलादेवी रोड, शिवाजी पार्क
  • एल.जे. रोड : गडकरी जंक्शन, दादरहून शोभा हॉटेल, माहीमपर्यंत
  • एनसी केळकर रोड : हनुमान मंदिर जंक्शन ते गडकरी जंक्शन, शिवाजी पार्क, दादर
    टी.एच. कटारिया रोड: गंगा विहार जंक्शन ते आसावरी जंक्शन, माहीम.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड : माहेश्वरी सर्कल ते कोहिनूर जंक्शन, दादर (पूर्व)
  • टिळक रोड : कोतवाल गार्डन सर्कल, दादर (पश्चिम) ते आरए किडवाई रोड, माटुंगा (पूर्व)
  • खान अब्दुल गफ्फार खान रोड : सी लिंक रोड ते जे.के. कपूर चौक मार्गे बिंदू माधव ठाकरे चौक.
  • थडाणी रोड : पोद्दार हॉस्पिटल जंक्शन ते बिंदू माधव ठाकरे चौक.
  • डॉ. ॲनी बेझंट रोड : पोद्दार हॉस्पिटल जंक्शन ते डॉ. नारायण हर्डीकर जंक्शन.

पर्यायी व्यवस्था

– एसव्हीएस रोडने उत्तरेकडे जाणारे लोक सिद्धिविनायक जंक्शन ते एस.के. बोले रोड – आगर बाजार – पोर्तुगीज चर्च – गोखले, एस.के. बोले रोड असा पर्यायी मार्ग घेऊ शकतात.

हेही वाचा : शंभरी गाठलेल्या कांद्यामुळे ग्राहक जेरीस, जाणून घ्या, शेतकऱ्यांना किती दर मिळतो, ग्राहकांना किती रुपये मोजावे लागतात

u

– एसव्हीएस रोडने दक्षिणेकडे जाणारे दांडेकर चौक डावीकडे पांडुरंग नाईक मार्गे, राजा बधे चौक – उजवे वळण – एल.जे. रोडने गोखले रोड किंवा एनसी केळकर रोडने जाऊ शकतात.

सभेसाठी येणारी वाहने उभी करण्याची व्यवस्था

१. पश्चिम आणि उत्तर उपनगरातून येणारे: पश्चिम आणि उत्तर उपनगरातून पश्चिम द्रुतगती महामार्गाने येणारे वाहनधारक सेनापती बापट मार्ग, माहीम रेती बंदर, कोहिनूर पीपीएल पार्किंग, इंडिया बुल्स फायनान्स सेंटर पीपीएल पार्किंग, कामगार स्टेडियम आणि सेनापती बापट रोडवर माहीम रेल्वे स्थानक आणि रुपारेल महाविद्यालय परिसरात वाहने उभी करू शकतात. इंडिया बुल्स वन सेंटर पीपीएल पार्किंगमध्ये हलकी मोटार वाहने पार्क केली जाऊ शकतात.

२. पूर्व उपनगरातून येणारे : ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे वापरून ठाणे आणि नवी मुंबईहून येणारे वाहनचालक दादर टीटी सर्कलजवळील फाइव्ह गार्डन्स, माटुंगा आणि आरएके ४ रोडजवळ उभ्या करू शकतात.

हेही वाचा : मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३. दक्षिण मुंबईतून येणारे: दक्षिण मुंबईतून येणाऱ्या वाहनधारकांना रवींद्रनाथ नाट्य मंदिर आणि इंडिया बुल्स फायनान्स सेंटर पीपीएल पार्किंग, रहेजा पीपीएल पार्किंग, सुदाम काळू अहिरे रोड, वरळी, पाडुरंग बुधकर मार्ग, ग्लॅक्सो जंक्शन ते कुरणे चौक, नारायण हर्डीकर मार्ग, नारायण हर्डीकर मार्ग, या ठिकाणी जाण्यासाठी वीर सावरकर रोडचा वापर करता येईल. सेक्रेड हार्ट हायस्कूलपासून, जे.के. कपूर चौक पार्किंग, दादर टीटी सर्कल आणि फाइव्ह गार्डन्स किंवा आरएके रोडवरील वाहनतळावर वाहने उभी करू शकतात.