scorecardresearch

प्रगतिपथावरील करिअर वाटांची माहिती; २७, २८ मे रोजी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’; विद्यार्थी आणि पालकांसाठी कार्यशाळा

बारावीनंतर कोणत्या शाखेत, कोणते पर्याय उपलब्ध आहेत, कुठे शिकायला जावे, मेडिकल की इंजिनीअिरग करावे, डिजिटल युगात करिअरचा ‘पासवर्ड’ बदलणार का, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात.

मुंबई : बारावीनंतर कोणत्या शाखेत, कोणते पर्याय उपलब्ध आहेत, कुठे शिकायला जावे, मेडिकल की इंजिनीअिरग करावे, डिजिटल युगात करिअरचा ‘पासवर्ड’ बदलणार का, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात. त्यामुळेच  विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे करिअर मार्गदर्शन कार्यशाळा अर्थात ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ हा उपक्रम घेण्यात येत आहे. येत्या २७, २८ मे रोजी रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे ही कार्यशाळा होणार आहे.

करिअर निवड करताना महत्त्वाचे असते ते निरनिराळय़ा करिअर पर्यायांची माहिती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन. बारावीनंतर करिअरच्या नव्या अवकाशात प्रवेश करण्याआधी ही सगळी माहिती योग्य त्या तज्ज्ञांकडूनच मिळवण्यासाठी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही करिअर कार्यशाळा विद्यार्थ्यांना मदत करते. या कार्यशाळेत तज्ज्ञांकडून सल्ला मिळेलच, पण त्यांना आपले प्रश्नही विचारता येणार आहेत.

मार्गदर्शक कोण?

ज्येष्ठ करिअर समुपदेशक डॉ. श्रीराम गीत, विवेक वेलणकर यांच्यासोबतच मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी आणि डॉ. राजेंद्र बर्वे, सायबर कायदेतज्ज्ञ युवराज नरवणकर, ‘भाडिपा’चा सारंग साठय़े, समाज माध्यम विश्लेषक आणि तज्ज्ञ केतन जोशी, बायोटेक्नॉलॉजी तज्ज्ञ प्रा. सिद्धिविनायक बर्वे आदी तज्ज्ञ या करिअर कार्यशाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतील.

मुख्य प्रायोजक :

  • गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, मुंबई युनिव्हर्सिटी

सहप्रायोजक :

  • विद्यालंकार क्लासेस
  • आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स
  • सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.

पॉवर्ड बाय :

  • ठाकूर इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी
  • व्हिसिलग वुड्स इंटरनॅशनल
  • क्लासरूम एज्युटेक
  • सुविद्या इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी
  • आर. ए. सी. यू. एस ग्रुप युनिव्हर्सिटीस फॉर मेडिकल अँड इंजिनिअिरग अ‍ॅडमिशनस

सहभागासाठी..  ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या करिअर कार्यशाळेत दोन्ही दिवस सारखेच विषय असणार आहेत, त्यामुळे विद्यार्थी आणि पालक आपल्या सवडीप्रमाणे एका दिवसाची निवड करू शकतात.

http://tiny.cc/MargYashacha_27May किंवा

http://tiny.cc/MargYashacha_28May येथे नोंदणी आवश्यक.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Information career paths progress lok satta marg yashacha workshops students parents ysh

ताज्या बातम्या