Jyoti Malhotra : यूट्युबर ज्योती मल्होत्राने काय काय केलं? होतं याचे आता रोज नवे पुरावे समोर येत आहेत. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योतीला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानचा अधिकारी दानिशच्या सांगण्यावरुन तिने पाकिस्तानचा दौरा केला होता हे समोर आलं आहे. दरम्यान हीच ज्योती चारवेळा मुंबईतही येऊन गेली होती.

लालबागचा राजाचे गर्दीचे व्हिडीओ काढले

पाकिस्तानची हेर ज्योती मल्होत्राने चारवेळा मुंबई दौरा केल्याचं उघड झालं आहे. ज्योती मल्होत्राचा मुंबई दौरा आता तपास यंत्रणांच्या स्कॅनरवर आला आहे. ज्योती मल्होत्राने २०२४ मध्ये तीनवेळा तर २०२३ मध्ये एकदा मुंबईचा दौरा केला होता.मुंबईत अनेक भागात तिने फोटो, व्हिडीओ काढले. २०२३ मध्ये लालबागचा राजा, तिथली गर्दी, याचा व्हिडीओ तिने काढला. हे व्हिडीओ, फोटो तिने कोणाला पाठवले याचा तपास सुरू आहे. मुंबईतल्या अनेक भागांचे फोटो काढून तिने ते नंतर डिलीट केलेत. ते विशेष डिव्हाईसे पुन्हा रिकव्हर करण्यात आलेत. पाकिस्तानला तर तिने हे सगळं पाठवलं नाही ना? याची माहिती आता पोलीस घेत आहेत. लालबागचा राजा आणि जीएसबी गणेश मंडळ अशा दोन्ही गणपतींना ज्योती मल्होत्राने भेटी दिल्या होत्या अशीही माहिती समोर आली आहे. दरम्यान ज्योती राजस्थानच्या अशा भागांमध्ये गेली होती जिथे सामान्यांना जाण्यास मज्जाव आहे.

मुंबई लोकलचा प्रवास

ज्योती मल्होत्राने २०२३ आणि २०२४ मध्ये मुंबईत येऊन लालबागचा दौरा केला होता. बोरिवली या ठिकाणी ती उतरली होती. तिथून लोकलने दादरला आली. दादरहून ट्रेन बदलून ती चिंचपोकळीला पोहचली होती. त्यासंदर्भात तिने एक सविस्तर ट्रॅव्हल व्लॉगही केला होता. दोन लाखांहून अधिक लोकांनी तो व्लॉग पाहिला होता. आता ही सगळी माहिती ज्योतीने पाकिस्तानला पुरवली का? याची चौकशी करण्यात येते आहे.

ज्योतीने तिच्या जबाबात म्हटलं आहे की मी ट्रॅव्हल विथ जो नावाने युट्यूब चॅनल चालवते. माझ्याकडे पासपोर्ट आहे. मी २०२३ मध्ये पाकिस्तान उच्चायुक्तालय दिल्ली या ठिकाणी गेले होते. पाकिस्तानचा व्हिसा मला मिळाला त्यानंतर मी पाकिस्तानला गेले. दिल्लीत दानिश या अधिकाऱ्याची आणि माझी भेट झाली. त्यानंतर माझा त्याच्याशी संपर्क वाढला. दानिशने सांगितल्यानंतर मी त्याच्या सूचनेनुसार दोनदा पाकिस्तानला गेले होते. मी तिथे अली हसनला भेटले. अली हसनने पाकिस्तानात माझी राहण्याची आणि फिरण्याची सगळी व्यवस्था केली होती.

देशातली गुप्त माहिती पाकिस्तानला पाठवल्याची कबुली

अली हसनने माझी आणि पाकिस्तानच्या सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांची भेट घडवून आणली. मी शकिर आणि राणा शाहबाज या दोघांना भेटले होते.शकिरचा मोबाइल नंबर मी जट रंधावा या नावाने मोबाइलमध्ये सेव्ह केला होता. त्यानंतर मी भारतात परतले होते. मी भारतात परतल्यानंतर Whats App, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामच्या माध्यमांतून पाकिस्तानातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. तसंच दिल्लीत जाऊन मी दानिशची भेट अनेकदा घेतली होती हे ज्योतीने मान्य केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. तसंच मी देशातली गुप्त माहिती पाकिस्तानला कळवली असंही तिने स्पष्ट केलं आहे.

Jyoti Malhotra Biography
तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये ती पाकिस्तानातील लाहोरमध्ये फिरताना दिसत आहे. (छायाचित्र: ट्रॅव्हल विथ जो/एफबी)

कोण आहे ज्योती मल्होत्रा?

ज्योती मल्होत्रा ही एका मध्यमवर्गीय घरातली मुलगी आहे. आलिशान आणि चैनीचं आयुष्य जगण्याच्या हव्यासामुळे ती देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाली.

वडिलांसह एका छोट्या घरात राहणाऱ्या ज्योतीला पैसे कमवण्याची खूप घाई झाली होती. त्यामुळे तिने शिक्षण झाल्यावर तातडीने नोकरी शोधण्यास सुरुवात केली.

शिक्षण झाल्यानंतर तिने सुरुवातीला म्हणजेच १४ वर्षांपूर्वी एका कोचिंग इन्स्टिट्युटमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम केलं. मात्र ती नोकरी तिने सोडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सतत नवीन नोकऱ्या शोधणे आणि जुन्या सोडणे यातच तिचं आयुष्य पुढे सरकत गेलं. पण तिला तिच्या स्वप्नांप्रमाणे जीवन जगता येत नव्हतं.