मुंबई : कोकण रेल्वेवरील कर्नाटकातील अस्नोटी आणि गोव्यातील लोलिम रेल्वे स्थानकादरम्यान २४ जुलै रोजी सकाळी १०.२० ते दुपारी १.५० दरम्यान ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या कालावधीत ओएचई वायरची देखभाल-दुरूस्ती आणि पायाभूत कामांची उभारणी केली जाईल. त्यामुळे कोकण रेल्वेवरली रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार आहे.
या रेल्वेगाड्यांच्या वेळेत होणार बदल
गाडी क्रमांक ५६६१६ मंगळुरू सेंट्रल – मडगाव जंक्शन पॅसेंजर (अनारक्षित) मंगळुरू सेंट्रल येथून पहाटे ५.३० वाजता सुटते आणि दुपारी १.३० वाजता मडगाव येथे पोहचते. ही रेल्वेगाडी मंगळुरू जंक्शन, ठोकूर आणि सुरतकल मार्गे प्रवास करते. परंतु, ब्लाॅक कालावधीत ही रेल्वेगाडी कुमटा – कारवार विभागादरम्यान ९० मिनिटे थांबत थांबत येणार आहे.
गाडी क्रमांक ५६६१५ मडगाव जंक्शन – मंगळुरू सेंट्रल पॅसेंजर रेल्वेगाडी मडगाववरून उशिराने सुटेल. ही रेल्वेगाडी वेळापत्रकानुसार दुपारी २.१० वाजता सुटते. परंतु, ब्लाॅक कालावधीत ही रेल्वेगाडी दुपारी ३.१० वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी सुमारे एक तास विलंबाने सुटल्याने प्रवाशांचा प्रवास कालावधी वाढेल.
गाडी क्रमांक ०९०५७ उधना – मंगळुरू जंक्शन रेल्वेगाडी उधना येथून रात्री ८ वाजता सुटते आणि मंगळुरू जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता पोहचते. ही रेल्वेगाडी रविवार आणि बुधवारी अशी आठवड्यातील दोन दिवस धावते. ही रेल्वेगाडी सुमारे १४०६ किमी अंतर कापते. परंतु, ब्लाॅक कालावधी मडगाव – कानाकोना विभागादरम्यान ३० मिनिटे थांबणार आहे.
गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण २५ जुलै रोजीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह सुरू होईल.
गाडी क्रमांक ०११५२ सावंतवाडी रोड – सीएसएमटी विशेष (दैनिक)
गाडी क्रमांक ०११७२ सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (दैनिक)
गाडी क्रमांक ०११५४ रत्नागिरी – सीएसएमटी विशेष (दैनिक)
गाडी क्रमांक ०११०४ सावंतवाडी रोड – सीएसएमटी विशेष (दैनिक)
गाडी क्रमांक ०११६८ सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (दैनिक)
गाडी क्रमांक ०११६६ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (साप्ताहिक)
गाडी क्रमांक ०११८६ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (साप्ताहिक)
गाडी क्रमांक ०११३० सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (साप्ताहिक)
गाडी क्रमांक ०१४४६ रत्नागिरी – पुणे जंक्शन विशेष (साप्ताहिक)
गाडी क्रमांक ०१४४८ रत्नागिरी – पुणे जंक्शन विशेष (साप्ताहिक)