मुंबई: म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ५८६३ घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपली असून पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवारी सकाळी ९ वाजता उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीत ५९ हजारांहून अधिक पात्र अर्जदार सहभागी होणार आहेत. या सोडतीसाठी पुणे मंडळ सज्ज झाले आहेत.

पुणे मंडळातील पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर येथील ५८६३ घरांचा सोडतीत समावेश आहे. पंतप्रधान आवास योजना, २० टक्के योजना, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनांमधील ही घरे आहेत. या घरांसाठी ५ सप्टेंबरपासून अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात झाली होती. सोडतीला म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने अर्जविक्री-अर्जविक्रीला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. शेवटच्या मुदतीत ६० हजार अर्ज दाखल झाले. यापैकी ५९ हजाराहून अधिक अर्जदार पात्र ठरले असून अर्जदार सोडतीत सहभागी होणार आहेत.

हेही वाचा… मोदी पुन्हा पंतप्रधान होणार हेच निकालाने अधोरेखित; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या सोडतीसाठी २४ नोव्हेंबर रोजी सोडत काढण्यात येणार होती. मात्र प्रशाकीय अडचणीचे कारण पुढे करीत पुणे मंडळाने ही सोडत पुढे ढकलली आणि अर्जदारांची प्रतीक्षा लांबली. पण आता मात्र अर्जदारांची प्रतीक्षा संपली आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता ५,८६३ घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे.