scorecardresearch

Premium

अखेर पुणे मंडळाच्या सोडतीला मुहूर्त सापडला; ५८६३ घरांसाठी मंगळवारी सोडत

या सोडतीत ५९ हजारांहून अधिक पात्र अर्जदार सहभागी होणार आहेत.

lottery 5863 houses Pune Mandal MHADA drawn Tuesday mumbai
अखेर पुणे मंडळाच्या सोडतीला मुहूर्त सापडला; ५८६३ घरांसाठी मंगळवारी सोडत (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबई: म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ५८६३ घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपली असून पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवारी सकाळी ९ वाजता उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीत ५९ हजारांहून अधिक पात्र अर्जदार सहभागी होणार आहेत. या सोडतीसाठी पुणे मंडळ सज्ज झाले आहेत.

पुणे मंडळातील पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर येथील ५८६३ घरांचा सोडतीत समावेश आहे. पंतप्रधान आवास योजना, २० टक्के योजना, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनांमधील ही घरे आहेत. या घरांसाठी ५ सप्टेंबरपासून अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात झाली होती. सोडतीला म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने अर्जविक्री-अर्जविक्रीला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. शेवटच्या मुदतीत ६० हजार अर्ज दाखल झाले. यापैकी ५९ हजाराहून अधिक अर्जदार पात्र ठरले असून अर्जदार सोडतीत सहभागी होणार आहेत.

Bank Holiday in February 2024
Bank Holiday in February 2024 : फेब्रुवारीत बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, किती दिवस बँका राहणार बंद?
Dharavi redevelopment eligible and ineligible slum dwellers house mumbai
धारावी पुनर्विकासात सर्व झोपडीवासीयांचे पुनर्वसन ! पात्र वगळता इतरांना धारावीबाहेर घरे ?
pune mahavikas aghadi marathi news, inauguration of water tank at gokhalenagar marathi news
पुणे : अजित पवारांच्या आधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले उद्घाटन; काही काळ तणावाचे वातावरण
Application by Foreign Creditors for Bankruptcy of Byju to Bangalore Bench of National Company Law Tribunal print economic news
परकीय देणेकऱ्यांकडून ‘बायजू’च्या दिवाळखोरीसाठी अर्ज; राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या बंगळूरु खंडपीठाकडे धाव

हेही वाचा… मोदी पुन्हा पंतप्रधान होणार हेच निकालाने अधोरेखित; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

दरम्यान, या सोडतीसाठी २४ नोव्हेंबर रोजी सोडत काढण्यात येणार होती. मात्र प्रशाकीय अडचणीचे कारण पुढे करीत पुणे मंडळाने ही सोडत पुढे ढकलली आणि अर्जदारांची प्रतीक्षा लांबली. पण आता मात्र अर्जदारांची प्रतीक्षा संपली आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता ५,८६३ घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lottery of 5863 houses of pune mandal of mhada will be drawn on tuesday mumbai print news dvr

First published on: 04-12-2023 at 11:19 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×