पाच जिल्ह्य़ांमध्ये ७० टक्के  रुग्ण; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता

मुंबई : राज्यात करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसत नसली तरी संसर्गदर वाढला आहे. आठ जिल्ह्यांत संसर्गदर राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक असून, एकूण रुग्णसंख्येच्या ७० टक्के रुग्ण पाच जिल्ह्यांत आहेत. या करोनास्थितीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करोनास्थितीबाबत चर्चा करण्यात आली. राज्यात २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या आठवडाभरात ४१,४२५ नव्या रुग्णांची भर पडली. त्यापैकी मुंबई, पुणे, नगर, सातारा आणि सोलापूर या पाच जिल्ह्य़ांमध्ये २८,३७३ रुग्ण आढळले. उर्वरित जिल्ह्य़ांमध्ये १३ हजार नव्या रुग्णांचे निदान झाले. पाच जिल्ह्य़ांमध्येच ७० टक्क्यांच्या आसपास रुग्ण आढळल्याने मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. या जिल्ह्य़ांमध्ये अधिक लक्ष के ंद्रित करण्यात येत आहे.

राज्याचा संसर्गदर (बाधितांचे प्रमाण) २.६७ टक्के  आहे. मात्र, पुणे ६.३३ टक्के , सांगली ५.५९ टक्के , नगर ५.३५ टक्के , सातारा ४.४३ टक्के , उस्मानाबाद ४.४० टक्के , नाशिक ३.३४ टक्के , रत्नागिरी ३.२९ टक्के  तर सिंधुदुर्ग ३.१८ टक्के  संसर्गदर आहे. आठ जिल्ह्य़ांमध्ये राज्य सरासरीपेक्षा संसर्गदर अधिक असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

उपचाराधीन रुग्णांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, सातारा आणि नगर या पाच जिल्ह्य़ांतील ७२ टक्के  बाधित आहेत.

चाचण्यांचे प्रमाण वाढवलेले नाही. मात्र, संसर्ग वाढत असल्याचे साप्ताहिक अहवालावरून दिसून येते. म्हणजेच चाचण्या वाढवल्या तर आणखी रुग्ण सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या दिसत असलेल्या रुग्णसंख्येपेक्षा जास्त रुग्ण राज्यात असण्याची भीती असल्याने खबरदारी बाळगणे गरजेचे आहे, असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच भंडारा, नंदुरबार, यवतमाळ आदी १७ जिल्ह्य़ांत रुग्णसंख्या १०० पेक्षा कमी आहे, याबद्दल समाधानही व्यक्त करण्यात आले. लशीची एक मात्रा घेतलेल्यांना मॉलमध्ये प्रवेश किं वा अन्य सवलती देण्याची मागणी काही मंत्र्यांनी के ली होती. पण, मुख्यमंत्र्यांनी ती फे टाळून लावली.

पश्चिम उपनगरे..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम उपनगरांतही अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. अनेक भागांत खड्डय़ांमुळे वाहनांचा वेग मंदावला होता. गोरेगाव, बोरिवली, मालाड आदी परिसरांत वाहने बराच काळ अडकली होती.