मुंबईः महादेव बुक बेटिंग अॅप प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) अभिनेता कपिल शर्मासह चार तारांकीत कलाकारांना समन्स बजावले होते. पण त्यांनी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी कालावधी मागितला असल्याचे सूत्रांनी सांगितले. कपिल शर्मा,श्रद्धा कपूर, हिना खान व हुमा कुरेशी यांना ईडीने याप्रकरणी समन्स बजावले होते. समाज माध्यमांवर या कलाकारांनी महादेव बुक बेटिंग अॅपची जाहिरात केल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. त्याबाबतच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी त्यांना बोलवण्यात आले होते. पण हुमा कुरेशी व कपील शर्मा यांनी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी मागितला आहे.

कपील शर्माचे परदेशात चित्रीकरण असल्यामुळे त्याने ईडीकडे वेळ मागितला आहे. तर हुमा कुरेशी व हिना खान यांनी वैयक्तीक कारणामुळे उपस्थित राहता येणार नसल्याचे कळवल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, श्रद्धा कपूर याबाबत कोणतीही माहिती ईडीकडून मिळू शकली नाही. यापूर्वी अभिनेता रणबीर कपूरला याप्रकरणी ईडीने समन्स बजावून शुक्रवारी(६ऑक्टोबर) चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्याने विविध समाज माध्यमांवर अॅपसाठी जाहिरात केल्याचा आरोप आहे. जाहिरातीसाठी त्याला मोठी रक्कम मिळाल्याचा संशय़ आहे. पण रणबीरने याप्रकरणी ईडीला ईमेल पाठवून चौकशीला उपस्थित राहण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी मागितला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणबीरसह आणखी सुमारे १२ हून अधिक तारांकित कलाकार, खेळांडू या अॅपच्या समाज माध्यांवरील प्रचारासाठी सहभागी झाले आहेत. त्यात टॉलीवूडमधील कलाकारांचाही समावेश आहे. ईडी लवकरच त्यांचेही जबाब नोंदवण्याची दाट शक्यता आहे.