Maharashtra Monsoon Update : गेल्या सहा दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागी स्थिरावले आहेत, त्यामुळे मोसमी पावसाचा पुढचा प्रवास मंदावलेला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. तर दुसरीकडे हडपसर भागातील रामटेकडी परिसरात टोळक्याने दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने शस्त्रे उगारून एका तरुणाला मारहाण केली, तसेच महिलांवर दगडफेक केली. दगडफेकीत दोन महिला जखमी झाल्या. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. मुंबई शहर, महानगर, पुणे आणि परसिर, नागपूर शहरातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल.

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Live Updates, 3 June 2025

15:44 (IST) 4 Jun 2025

दिडशे दिवस लोटूनही धान आलेच नाही, बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूकः केदार कंपनी विरोधात ग्राहक मंचात तक्रार

पवनी तालुक्यातील मांगली चौरास येथील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामा करता आसगाव येथील गुरुदेव कृषी केंद्रातून केदार सीड्स कंपनीच्या के एस गोल्ड नावाचे बियाणे शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून खरेदी केले. ...सविस्तर बातमी
15:41 (IST) 4 Jun 2025

पदवी प्रवेशाची शेवटची तिसरी प्रवेश यादी गुरुवारी जाहीर होणार; ६ ते १० जूनदरम्यान प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया

तिसऱ्या प्रवेश यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी आणि हमीपत्र अर्जासह शुल्क भरून ६ ते १० जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे. ...अधिक वाचा
15:40 (IST) 4 Jun 2025

पोलिसांना चकमा देणारा चोर तंत्रज्ञानाच्या मदतीने गजाआड

अंधेरी स्थानाकातील चेहरा ओळख प्रणाली असलेल्या कॅमेर्यात तो कैद झाला, नंतर ई वाहन पोर्टलद्वारे माहिती मिळवून पोलिसांनी त्याला गजाआड केले. ...सविस्तर वाचा
14:31 (IST) 4 Jun 2025

विद्यार्थ्यांना शाळेतच स्वच्छतेचे धडे द्या…कचरा उपविधीबाबत मुंबईकरांकडून २७०० सूचना व हरकती

कचरा, स्वच्छतेबाबत शाळांमध्ये नागरी शिक्षण द्यावे, त्याचबरोबर नागरिकांकडून रोख रकमेऐवजी ऑनलाईन पद्दतीने दंड वसूल करण्याची सूचना नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेला केली आहे. ...सविस्तर वाचा
13:35 (IST) 4 Jun 2025

स्वमालकीच्या साडेचारशे बस; बेस्टच्या ताफ्यातील भाडेतत्वावरील बस ८३ टक्क्यांवर

बेस्टच्या स्वमालकीच्या बसचा ताफा आता १७ टक्क्यांपेक्षा कमी झाला असून. येत्या काळात बेस्ट बसचा स्वमालकीचा ताफा संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. ...वाचा सविस्तर
13:26 (IST) 4 Jun 2025

अतिधोकादायक ९६ इमारतींमधील रहिवाशांना दहमहा २० हजार रुपये भाडे; संक्रमण शिबिरातील गाळ्यांच्या कमतरतेमुळे म्हाडाचा निर्णय

दुरुस्ती मंडळाने ९६ अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना संक्रमण शिबिराच्या गाळ्याच्या बदल्यात दरमहा २० हजार रुपये घरभाडे देण्याचा निर्णय घेतला आहे. ...वाचा सविस्तर
12:58 (IST) 4 Jun 2025

मुंबई हल्ल्यांतील शहीद पोलिसाला मरणोत्तर पदोन्नती… चकमक विजय साळसकरांचे चालक अरुण चित्ते यांना पदोन्नती

२६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस शिपाई अरुण रघुनाथ चित्ते यांना मरणोत्तर सहाय्यक उपनिरीक्षक (चालक) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. ...सविस्तर वाचा
12:44 (IST) 4 Jun 2025

पदोन्नती मिळालेल्या मुंबई; पोलिसांना यापुढे विशेष सन्मान!

मुंबई पोलीस दलात यापुढे पोलिसांना पदोन्नती जाहीर झाल्यानंतर संबंधित पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुटुंबीयांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक पदोन्नती बहाल करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी जाहीर केला आहे. ...अधिक वाचा
12:08 (IST) 4 Jun 2025

रिया चक्रवर्तीला परदेशी जाण्यास परवानगी, चित्रीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत परदेश दौरा

अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला १ जून ते १५ सप्टेंबर दरम्यान व्यावसायिक कामांसाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. ...अधिक वाचा
16:32 (IST) 3 Jun 2025

मुंबईतील नाल्यांमध्ये गाळ अद्यापही जैसे थे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आरोप

पालिकेचे नालेसफाईचे आकडे फसवे असून अद्यापही मुंबईतील नाल्यांमध्ये गाळ जैसे थे असल्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. ...वाचा सविस्तर
16:24 (IST) 3 Jun 2025

जिथे कीर्तन, तिथे वृक्षारोपण... रोपाची योग्य देखभाल, तरच कीर्तनाला होकार

कीर्तनातून डोळ्यांत अंजन घालण्याची किमया कीर्तनकार साधत असतात. आपल्या कृतीतून व वाणीतून समाजमनावर सकारात्मक संस्कार करण्याचे काम सातत्याने कीर्तनकार करीत असतात. याप्रमाणे ह. भ. प. अश्विनी महाराज टाव्हरे गावोगावी पर्यावरण प्रबोधनाची वारी नेण्याचे काम करीत आहेत. ...सविस्तर बातमी
16:06 (IST) 3 Jun 2025

कोकण रेल्वे सज्ज! पावसाळ्यासाठी २४ तास यंत्रणा, कर्मचारी, तंत्रज्ञान तैनात

प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे २४ तास कार्यरत राहणारे नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. ...अधिक वाचा
14:26 (IST) 3 Jun 2025

वर्षभरासाठी २० रुपये कत्तल शुल्क आकारावे - समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची मागणी

देवनार पशुवधगृहाचे आधुनिकीकरण करावे आणि मुंबईत मांस बाजार पूर्व, पश्चिम आणि उपनगर असे विकेंद्रीत पद्धतीने करावे, अशी मागणी रईस शेख यांनी यावेळी केली. ...सविस्तर बातमी
13:53 (IST) 3 Jun 2025

४० विधि महाविद्यालयांवर विद्यापीठाची प्रवेशबंदी - मान्यताप्राप्त प्राचार्य, प्राध्यापकांची भरती न केल्याने निर्णय

मुंबई विद्यापीठाने एक तपासणी समिती तयार करून विधि महाविद्यालयांना अचानक भेटी दिल्या आणि संलग्नित ४० विधि महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ मान्यताप्राप्त प्राचार्य व प्राध्यापक नसल्याचे निदर्शनास आले ...वाचा सविस्तर
13:12 (IST) 3 Jun 2025

शहरबात : वसईतील पारंपारिक व्यवसाय अडचणीत

मीठ उत्पादन, वीट भट्टी, मत्स्यव्यवसाय, भात व फ़ुलशेती असे पूर्वापार चालत आलेले व्यवसाय अडचणीत सापडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ...वाचा सविस्तर
12:48 (IST) 3 Jun 2025

एपीएमसी मसाला मार्केटमध्ये प्रवेशद्वार वादात, परवानगीशिवाय सुरू बांधकाम, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आणि एफ विंगच्या बाजूला, आधीच अस्तित्वात असलेल्या डी विंगच्या जावक प्रवेशद्वारापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर हे नवीन प्रवेशद्वार उभारले जात असून, या कृतीमुळे वाहतूक कोंडीचा गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...सविस्तर बातमी
12:32 (IST) 3 Jun 2025

‘पाम बीच’वर सुट्टीचा वार कोंडीचा, सतरा प्लाॅझा परिसरात बेशिस्तीचा मनस्ताप

सतरा प्लाझा आणि लगतच्या संकुलांमध्ये तळमजल्यावरील हाॅटेलांमध्येही मोठया संख्येने नागरिक कुटुंब कबिल्यासह येत असतात. ही सगळी वाहने व्हॅले पार्किगच्या नावाखाली मुख्य रस्त्यावरील दोन मार्गिका अडवून उभ्या असतात. ...अधिक वाचा
11:58 (IST) 3 Jun 2025

सायबर भामट्याचा थेट मोबाइलमध्ये प्रवेश, अभियंत्याने गमावले १४ लाख रूपये

मुंबईच्या पश्चिम सायबर विभागाने भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१९ अन्वये फसवणुकीचा, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...वाचा सविस्तर
11:31 (IST) 3 Jun 2025

छत कोसळल्याने नेरुळमधील जीर्ण इमारत त्वरित सोडण्याचे आदेश, पालिकेने अतिधोकादायक जाहीर करूनही इमारतीत रहिवास

या घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेने रहिवाशांना तात्काळ इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वीज पाणी मलनिःसारण वाहिनी सेवा बंद करण्यात येणार आहेत. ...अधिक वाचा
11:27 (IST) 3 Jun 2025

हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप असलेल्या तरूणाला उच्च न्यायालयाचा दिलासा; नोकरीसाठी अमेरिकेत जाण्यास उच्च न्यायालयाकडून परवानगी

नोकरीसाठी परदेशी जाण्यास परवानगी देऊन उच्च न्यायालयाने त्याला दिलासा दिला. याचिकाकर्ता आणि त्याच्या विभक्त पत्नीने याबाबत परस्पर सहमतीने ही बाब मान्य केल्यानंतर न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिलासा दिला. ...वाचा सविस्तर
11:15 (IST) 3 Jun 2025

बटाट्याच्या दरात मोठी घसरण, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

एकंदरीत, मोठ्या प्रमाणावर झालेली आवक आणि वाढलेल्या दमटपणामुळे मालाच्या दर्जावर होणारा परिणाम यामुळे बटाट्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघेही चिंतेत आहेत. ...सविस्तर वाचा
10:56 (IST) 3 Jun 2025

पुण्यातील येरवडा भागात डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे : विरुद्ध दिशेने आलेल्या डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना येरवडा भागातील शास्त्रीनगर ते गुंजन चित्रपटगृह रस्त्यावर रविवारी घडली. याप्रकरणी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर बातमी...

10:54 (IST) 3 Jun 2025

पुणे महानगर क्षेत्रातील प्रस्तावित रस्त्यांना गती, १५० रस्त्यांसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया पीएमआरडीए कडून सुरू

पुणे : पुणे महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकसित करण्याबरोबरच वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित १५० रस्त्यांसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सुरू करण्यात आली आहे. तसेच, ८५ हेक्टर क्षेत्रावरील आरक्षित भूखंडासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

10:52 (IST) 3 Jun 2025

नियम मोडून व्हिक्टोरियाची मुंबईच्या रस्त्यावर धाव

मुंबई – बंदी असताना मुंबईत व्हिक्टोरिया घोडागाडी सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पेटा संस्थेने दिलेल्या तक्रारीनुसार गावदेवी पोलिसांनी एका व्हिक्टोरिया घोडागाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर बातमी...

10:51 (IST) 3 Jun 2025

मुंबई : केईएम रुग्णालयातील डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा

मुंबई- पालिकेच्या केईएम रुग्णालयातील एका विभाग प्रमुखांवर भोईवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रुग्णालयातील सहाय्यक प्राध्यापकाच्या पत्नीने याबाबत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनसुार आरोपी डॉक्टराने २०१५ ते २०२५ या काळात तक्रारदार महिलेचा तसेच त्यांच्या दोन लहान मुलींचा विनयभंग केला होता.

सविस्तर बातमी...

10:49 (IST) 3 Jun 2025

हडपसर भागातील रामटेकडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

पुणे : हडपसर भागातील रामटेकडी परिसरात टोळक्याने दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने शस्त्रे उगारून एका तरुणाला मारहाण केली, तसेच महिलांवर दगडफेक केली. दगडफेकीत दोन महिला जखमी झाल्या. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली.

सविस्तर बातमी...

10:49 (IST) 3 Jun 2025

मोसमी पावसाची गती मंदावली… सहा दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागी…

यंदा राज्यात मोसमी पावसाच्या आगमनाची सुरुवात अपेक्षेपेक्षा लवकर झाली असली तरी तूर्तास त्यांची गती सध्या मंदावली आहे. गेल्या सहा दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागी स्थिरावले आहेत, त्यामुळे मोसमी पावसाचा पुढचा प्रवास मंदावलेला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

वाचा सविस्तर...

 

nagpur mumbai pune latest marathi news today in marathi

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे