Mumbai Pune Nagpur News Updates 12 May 2025 : राज्यात आठवडाभर वळीवाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. परिणामी विदर्भात वाऱ्याचा वेग वाढणार आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दरम्यान, या कालावधीत संपूर्ण राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच राज्यातील सहकार चळवळीवरुन नेहमीच एक दुसऱ्याकडे बोटे दाखवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सोमवारी एका व्यासपीठावर येणार आहेत. या घडामोडींची तसेच मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 12 May 2025

22:54 (IST) 12 May 2025

लवळेकर, मोहाडीकर यांना तळवलकर ट्रस्टचे पुरस्कार

पुणे : कृ. ब. उर्फ अण्णा तळवलकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने ज्ञान प्रबोधिनी मानसशास्त्र संस्थेच्या संचालक व ज्येष्ठ मानसशास्त्र संशोधिका डॉ. अनघा लवळेकर यांना समाजशिक्षक पुरस्कार आणि कंझ्युमर शॉपी या व्यवसाय प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणाऱ्या मीनल मोहाडीकर यांना अनुकरणीय उद्योजक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात रविवारी (१८ मे) सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सुदर्शन हसबनीस यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे श्रीकांत कुलकर्णी आणि चारुदत्त आलेगावकर यांनी सोमवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

22:00 (IST) 12 May 2025

मंत्री म्हणतात, “तब्बल ५२ वर्षांनी जन्मभूमित आलोय, आनंद तर होणारच…’

आरटीओ कार्यालय ई - लोकार्पण प्रसंगी बोलतांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की मी तब्बल ५२ वर्षानंतर माझ्या जन्मभूमीत येत आहे. माझ्या जन्मगावात येणे झाले नाही. पण आमदार असतांना व आता लोकप्रिय पालकमंत्री असलेले डॉ. भोयर हे मात्र माझ्या जन्मगावाची काळजी घेत असतात. ...सविस्तर बातमी
21:37 (IST) 12 May 2025

“पाकिस्तानच्या गोळ्यांना तोफगोळ्याने उत्तर” उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठणकावले; म्हणाले ‘भारतीयांच्या नादी…”

बुलढाणा जिल्ह्यातील इसरूळ (ता. चिखली) येथे संत चोखामेळा यांचा पुण्यतिथी सोहळा १० मे ते १८ मे पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य, आयुष, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी हजेरी लावली. ...सविस्तर बातमी
20:13 (IST) 12 May 2025

‘‘राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो’’ युतीतील जुन्या सहकारी पक्षाचा सत्ताधाऱ्यांना इशारा

सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळली पाहिजेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी येथे व्यक्त केली. ...सविस्तर वाचा
19:55 (IST) 12 May 2025

‘‘पैनगंगा ते नळगंगा प्रकल्प याच वर्षी सुरू करणार ” मुख्यमंत्र्यांची घोषणा; नागपूर ते वर्धादरम्यान…

मुख्यमंत्री म्हणाले, वैनगंगा ते नळगंगा हा सिंचन प्रकल्प याच वर्षी सुरू करणार. या प्रकल्पामुळे दहा लाख एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. एक लाख कोटी रुपये या प्रकल्पवार गुंतवीत आहोत. ...अधिक वाचा
19:21 (IST) 12 May 2025

नागपूर जिल्ह्यात खाणीच्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू, दोन मुलांचा समावेश

एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात सर्वच जण पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज कुही पोलिसांनी वर्तवला आहे. ...सविस्तर वाचा
18:17 (IST) 12 May 2025

तीन दिवसांत २९९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या, चंद्रपूर जिल्हा परिषदेत…

पंधरवड्यापूर्वी चंद्रपूर जिल्हा परिषदचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर ९ मे रोजी बदली प्रक्रिया सुरू केली. ९ ते ११ मे या तीन दिवसांत विक्रमी २९९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. ...अधिक वाचा
17:52 (IST) 12 May 2025

कोणत्याही परिस्थितीत रुग्णांचे मृतदेह अडवू नका ! सर्व खासगी रुग्णालयांना महापालिकेची तंबी

खासगी रुग्णालयांनी देयकासाठी रुग्णांचे मृतदेह अडवून ठेवल्याच्या दोन घटना नुकत्याच घडल्या होत्या. याची महापालिकेच्या आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. ...वाचा सविस्तर
17:51 (IST) 12 May 2025

पुण्यात कुटुंब नियोजनात पुरुषांचा टक्का कमीच

पुण्यात कुटुंब नियोजनात महिलांच्या तुलनेत पुरुष खूप मागे असल्याचे समोर आले आहे. गेल्या चार वर्षांत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण केवळ ३ टक्के आहे. ...वाचा सविस्तर
17:51 (IST) 12 May 2025

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळणार विविध कौशल्याचे धडे

शिवसेनेच्या (शिंदे) जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची क्षमता बांधणी कार्यशाळा आज, मंगळवारी (१३ मे) होणार आहे. ...सविस्तर वाचा
17:05 (IST) 12 May 2025

बारामतीवर अजित पवारांनंतर आता सुनेत्रा पवारांचे 'लक्ष'

लोकसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला तरी काहीच दिवसांत राज्यसभेवर झालेली निवड आणि त्यानंतर थेट तालिका अध्यक्षपदी निवड झालेल्या खासदार सुनेत्रा पवार आता बारामतीतील विकासकामात लक्ष घालू लागल्या आहेत. ...वाचा सविस्तर
15:33 (IST) 12 May 2025

शाहरुख खानच्या निर्मिती कंपनीतील कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळणार; उच्च न्यायालयाची परवानगी

अभिनेता शाहरुख खान याच्या निर्मिती कंपनीतील एका २८ वर्षीय महिला कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला देण्यात येणाऱ्या ६२ लाख रुपयांच्या भरपाईला उच्च न्यायालयाने नुकतीच मान्यता दिली आहे. ...अधिक वाचा
15:27 (IST) 12 May 2025

‘शॉर्ट व्हिसा’वर आलेला एकही पाकिस्तानी नागपुरात नाही!

पोलिसांची तत्परता पहलगाम येथे पर्यटकांवरील हल्ल्यानंतर ४८ तासांच्या आत पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा इशारा केंद्र सरकारने दिला हो ...अधिक वाचा
14:31 (IST) 12 May 2025

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसात पाच महिलांचा बळी

तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात जाणे आता कठीण झाले आहे. तेंदूसाठी जंगलात गेले तरी परत येणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे ...वाचा सविस्तर
14:12 (IST) 12 May 2025

वांद्रे -कुर्ला संकुलात रस्ता रुंदीकरणासह एकेरी वाहतूक व्यवस्था; वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एमएमआरडीएचा पुढाकार

सुमारे ३७० हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) रोजगाराच्या संधी वाढत आहेत. आजच्या घडीला बीकेसी हे मुंबईच्या वित्त, व्यवसाय आणि नवोन्मेषाचे प्रमुख केंद्र झाले आहे. ...अधिक वाचा
14:11 (IST) 12 May 2025

रस्त्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप; माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुंंबईत रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे सुरू असून त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दक्षिण मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे. ...सविस्तर वाचा
14:11 (IST) 12 May 2025

भारत-पाक तणाव : मुंबईत ड्रोन उडविल्याप्रकरणी तरूणाविरोधात गुन्हा

मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला ड्रोन दिसल्याचा दूरध्वनी ...अधिक वाचा
14:04 (IST) 12 May 2025

‘हिंदू शेरनी आता थोड्याच दिवसाची पाहुणी’ नवनीत राणा यांना थेट पाकिस्तानातूनच…

पाकिस्तानमधील वेगवेगळ्या क्रमांकांवरून या प्रकारच्या धमकीचे संदेश सातत्याने येत असून राणा यांनी यासंबंधीची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे. सुरक्षा यंत्रणांनी याची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला आहे. ...अधिक वाचा
13:25 (IST) 12 May 2025

भारत - पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण… हे आहेत आजचे दर…

दोन्ही देशांनी शस्त्रसंधी केल्याचे जाहीर केले. त्यानंतर सोन्याच्या दरात चांगलीच घसरण होत असल्याचे बघायला मिळत आहे. या दराबाबत आपण जाणून घेऊ या. ...अधिक वाचा
13:19 (IST) 12 May 2025

कवंडेच्या जंगलात पोलीस-नक्षल चकमक…नक्षलवाद्यांचा तळ नष्ट…घटनास्थळावरुन अनेक शस्त्रास्त्रे आणि…

भामरागड तालुक्यातील कवंडे गावालगत ११ मे रोजी नक्षलवाद्यांनी तळ ठोकल्याची माहिती मिळाल्यावरुन सी- ६० जवानांनी अभियान राबविले. ...सविस्तर बातमी
13:18 (IST) 12 May 2025

दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन कसे करता येणार? राज्य मंडळाने दिली माहिती

ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. ...सविस्तर बातमी
12:53 (IST) 12 May 2025

दहावीचा निकाल उद्या, राज्य मंडळाची घोषणा

राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यभरातील सुमारे १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. ...सविस्तर बातमी
12:15 (IST) 12 May 2025

भाजीपाल्याचे दर कडाडले… प्रत्येक घरातील बजेट….

शहरात बहुतांश भाज्या १०० रुपये किलो, दर्जेदार लिंबू १० रुपये नग आहे. या भाजीपल्यावर नियंत्रण कुणाचे हा प्रश्न अनुत्तरीत आहे. ...सविस्तर बातमी
11:48 (IST) 12 May 2025

भारत- पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण... हे आहे आजचे दर...

भारत- पाकिस्तान दरम्यान तणावजन्य स्थिती निवळत असतांना पून्हा सोन्याचे दर घसरले आहे. परंतु आताही ग्राहकांच्या मनात सोन्याच्या दराबाबत संभ्रम आहे. ...अधिक वाचा
11:31 (IST) 12 May 2025

आम्ही तोडणारे नव्हे, तर जोडणारे- आशिष शेलार

महानगरपालिकेच्या पूल विभागाने पावसाळ्यापूर्वी तीन उड्डाणपूल खुले करण्याचे नियोजन केले आहे. ...अधिक वाचा
11:18 (IST) 12 May 2025

धक्कादायक! 'नीट'चे टेंशन अन् दोन विद्यार्थ्यांनी संपवले जीवन…

अभ्यासाच्या तणावातूनच या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विविध कारणांवरून सर्वसामान्यांच्या जीवनात तणावाची परिस्थिती निर्माण होत असते. ...अधिक वाचा
10:47 (IST) 12 May 2025

मेळघाटातील गर्भवती वाघिणीचा मध्यप्रदेशात संशयास्पद मृत्यू

मध्य प्रदेशातील शहापूर वनक्षेत्रातील गावातील भावसा वनक्षेत्रात रविवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गर्भवती वाघिणी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली ...अधिक वाचा
09:45 (IST) 12 May 2025

सुश्रूषेसाठी ठेवलेल्या नोकरांकडून पुण्यात ज्येष्ठाची ३५ लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे पती आजारी आहेत. त्यांची देखभाल, तसेच सुश्रूषेसाठी आरोपी लिमकर आणि मोरे यांना नेमण्यात आले होते. ...सविस्तर बातमी
09:44 (IST) 12 May 2025

पुणे : अवकाळी पावसामुळे फळभाज्यांची आवक कमी; फ्लाॅवर, ढोबळी मिरची, शेवगा, गाजराच्या दरात वाढ

अवकाळी पाऊस, तसेच उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. ...सविस्तर बातमी
09:44 (IST) 12 May 2025

मुलाने आईला प्रेमाने लाडू भरवला अन्…

जागतिक मातृदिनानिमित्त जय गणेश व्यासपीठच्या वतीने शहराच्या विविध भागांतील २१ गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या मातांचा विघ्नहर्ता कार्यकर्ता मातृगौरव सन्मान करण्यात आला. ...सविस्तर वाचा

nagpur mumbai pune rain latest marathi news today in marathi

मुंबई पुणे नागपूर पाऊस ब्रेकिंग न्यूज टुडे