मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कर्जत स्थानकावर प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी १० ऑक्टोबर रोजी विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार असून त्यामुळे कर्जत-खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा उपलब्ध नसेल. ब्लाॅक कालावधीत दिवाळीची खरेदी करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे, नोकरदार वर्गाचे हाल होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन आठवड्यापासून कर्जत यार्ड पुनर्रचना कामासंदर्भात कर्जत स्थानकावर प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येत आहेत. शुक्रवारी शेवटचा विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी ११.२० ते सायंकाळी ४.२० वाजेपर्यंत भिवपुरी स्थानक – जांब्रुंग केबिन – ठाकूरवाडी – नागनाथ केबिन ते कर्जत स्थानकादरम्यान ब्लाॅक असेल. या कालावधीत कर्जत ते खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही.
या डाऊन लोकल रद्द
- दुपारी १२, दुपारी १.१५ आणि दुपारी ३.३९ वाजता सुटणाऱ्या कर्जत ते खोपोली लोकल रद्द करण्यात येतील.
या अप लोकल रद्द
- सकाळी ११.२०, दुपारी १२.४० आणि दुपारी २.५५ वाजता सुटणाऱ्या खोपोली ते कर्जत लोकल रद्द करण्यात येतील.
या लोकल अंशत: रद्द
- दुपारी १२.२० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते खोपोली लोकल कर्जतपर्यंत चालवण्यात येईल. कर्जत ते खोपोलीदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल.
- दुपारी १.४८ वाजता सुटणारी खोपोली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल कर्जत येथून नियोजित वेळेत चालवण्यात येईल. खोपोली ते कर्जत दरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल.