मुंबई : दिवाळी, छठ पुजेच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस – वाराणसी दरम्यान १२ विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेगाड्यांचे तिकीट रविवारपासून उपलब्ध करण्यात आले असून ते सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

गाडी क्रमांक ०४२२५ विशेष रेल्वेगाडी १४ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबरदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रत्येक मंगळवारी दुपारी ४.५५ वाजता सुटेल आणि वाराणसी येथे तिसऱ्या दिवशी रात्री २.०५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०४२२६ विशेष गाडी १३ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबरदरम्यान वाराणसी येथून प्रत्येक सोमवारी रात्री १.३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २.२५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती (भोपाळ), बीना, वीरांगणा लक्ष्मीबाई झासी, ओराई, कानपूर, लखनौ, सुलतानपूर आणि जौनपूर सिटी येथे थांबे असतील. या रेल्वेगाडीला ४ वातानुकूलित द्वितीय, ९ वातानुकूलित तृतीय आणि २ जनरेटर कार असतील.

प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने दिवाळी आणि छठ पूजा उत्सव २०२५ दरम्यान ६० अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या चालवण्यास सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आसनसोल साप्ताहिक वातानुकूलित विशेष रेल्वेगाड्या सुरू झाल्या असून एकूण १२ फेऱ्या धावणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करीमनगर साप्ताहिक वातानुकूलित विशेष रेल्वेगाडीच्या १२ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस ते मुजफ्फरपूर साप्ताहिक वातानुकूलित विशेष रेल्वेगाडीच्या १२ फेऱ्या, पुणे ते हजरत निजामुद्दीन द्विसाप्ताहिक अतिजलद वातानुकूलित विशेष रेल्वेगाडीच्या २४ फेऱ्या चालवण्यात येत आहेत.

पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल ते शकूर बस्ती, वांद्रे टर्मिनस ते गांधीधाम दरम्यान विशेष तिकीट भाड्याने विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०९००३/०९००४ मुंबई सेंट्रल-शकूर बस्ती वातानुकूलित अतिजलद विशेष रेल्वेगाडीच्या ९२ फेऱ्या चालवण्यात, तर गाडी क्रमांक ०९४७१/०९४७२ वांद्रे टर्मिनस-गांधीधाम साप्ताहिक अतिजलद विशेष रेल्वेगाडीच्या १० फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण रविवारपासून सुरू झाले आहे. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर तिकीट उपलब्ध आहे.

  • गाडी क्रमांक ०९००३ मुंबई सेंट्रल ते शकूर बस्ती वातानुकूलित अतिजलद विशेष रेल्वेगाडी १५ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरदरम्यान दररोज सकाळी १०.३० वाजता मुंबई सेंट्रलहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता शकूर बस्ती येथे पोहोचेल.
  • गाडी क्रमांक ०९४७१ वांद्रे टर्मिनस ते गांधीधाम साप्ताहिक अतिजलद विशेष रेल्वेगाडी १४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवारी दुपारी १२:३० वाजता वांद्रे टर्मिनस येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १.३० वाजता गांधीधाम येथे पोहोचेल.