Mumbai Crime News : मुंबईतल्या अंधेरी पश्चिम भागात एका महिलेने मद्यधुंद अवस्थेत तिच्या दोन मित्रांसह धिंगाणा घातला. एवढंच नाही तर या महिलेने पबचे कर्मचारी आणि काही पोलिसांना मारहाणही केली. आंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ‘लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स’ या पबमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी या महिलेसह तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे.

नेमकी काय घडली घटना?

अंधेरी भागात असलेल्या लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स या पबमध्ये ही महिला आली होती. तिच्याबरोबर तिचे दोन मित्रही होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास या महिलेने धिंगाणा सुरु केला आणि पबमधल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करायला सुरुवात केली. या महिलेने कर्मचाऱ्यांना मारहाण का केली? हे कारण समजू शकलेलं नाही. कर्मचाऱ्यांना जेव्हा मारहाण करण्यात आली तेव्हा पोलिसांना फोन करण्यात आला. पोलिसांची गाडी जेव्हा लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स या पबमध्ये आली तेव्हा त्यातल्या ASI आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनाही या महिलेने आणि तिच्या दोन मित्रांनी कानशिलात लगावली.

हे पण वाचा- क्रौयाची सीमा! अल्पवयीन पीडितेच्या गुप्तांगाला चटके, अनैसर्गिक अत्याचार, डॉक्टरांच्या अंगावर आला काटा

पोलीस निरीक्षक मुकुंद यादव यांच्या हाताला घेतला चावा

ही माहिती मिळताच नाईट ड्युटीवर आलेले पोलीस निरीक्षक मुकुंद यादव हेदेखील बीट मार्शलची गाडी घेऊन पबला गेले. तिथे या महिलेने मुकुंद यादव यांच्यावरही हल्ला करुन त्यांना मारहाण केली. तसंच पोलीस अधिकारी महिलेला मद्यधुंद अवस्थेतली ही महिला चावली. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पण वाचा- खून प्रकरणात मांडवली! गुजरात हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट आश्चर्यचकित

मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा करणाऱ्या या महिलेच्या हल्ल्यात सात पोलीस आणि पबचे तीन कर्मचारी असे एकूण दहाजण जखमी झाले आहेत. महिलेने जो धिंगाणा घातला तो संपूर्ण हाय व्होल्टेज ड्रामा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी ‘लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स’ या पबचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. तसंच आंबोली पोलिसांनी सदर महिलेच्या दोन्ही कार जप्त केल्या आहेत.