मुंबई : धावत्या रेल्वेगाडीतून उतरताना किंवा रेल्वेगाडी पकडताना प्रवाशांचा तोल जाऊन, जीव जाण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील तिकीट तपासनीसाने अतुलनीय शौर्य दाखविल्याने एका महिलेचे प्राण वाचविले. या कामगिरीसाठी मुंबई विभागाचे वरिष्ठ तिकीट तपासनीस रामावतार मीना यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा – Ajit Pawar : “कुटुंबातील फूट समाज स्वीकारत नाही, मलाही याचा अनुभव”, अजित पवारांची कबुली!
नुकताच गाडी क्रमांक ११०२९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस पुणे स्थानकात आली असता एक महिला अनवधानाने घसरली. ती चालत्या रेल्वेगाडी खाली जाण्याची शक्यता होती. मात्र, कर्तव्यावरील तिकीट तपासनीस मीना यांनी तिला पडताना पाहिले. त्यांनी त्यांच्याकडील बॅग फेकून दिली आणि महिलेला सुरक्षितपणे खेचले. दरम्यान, लाखो प्रवाशांचा सुरळीत आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे कर्मचारी सतर्क आहेत. तसेच रेल्वे प्रवाशांनी धावत्या रेल्वेगाडीत चढणे किंवा उतरणे टाळण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून केले आहे.