Mumbai, Pune , Nagpur Breaking News Updates, 05 August 2025 : देशातील ‘रिपाइं’च्या ऐक्यासाठी व दलित एकजुटीसाठी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व ‘बसप’ अध्यक्षा मायावती यांनी ‘रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया’चे नेतृत्व करावे, असे आवाहन ‘रिपाइं’ अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच बहुप्रतिक्षित अजनी-पुणे स्लीपर वंदे भारत ट्रेन लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे, याच महिन्यात तिचे उदघाटन होण्याची शक्यता आहे. अशा विविध क्षेत्रातील मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर शहर आणि परिसरातील महत्वाच्या विविध ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या…
Live Updates
Mumbai Pune Nagpur Latest News Updates in Marathi : महत्त्वाच्या घडामोडींची माहिती एका क्लिकवर...
डाॅ. विजयकुमार गावित यांना कोणता हक्क ?… आमदार चंद्रकांत रघुवंशी का संतापले ?
विधानसभा निवडणुकीत मुलगी आणि भाऊ यांना शिंदे आणि अजित पवार गटाच्या विरोधात उतरविणारे माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना राजकीय विश्वासाची भाषा करण्याचा हक्क काय, असा प्रश्न आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे.
...सविस्तर वाचा
Potholes News: भिवंडीच्या पोलीस उपायुक्तांनी ठेकेदारांना दिला इशारा…; म्हणाले, " रस्त्याच्या दुरवस्थेमुळे जर अपघात झाला तर…"
भिवंडी शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून यावरून पालिका प्रशासनावर टिका होत आहे. तसेच शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. ...अधिक वाचा
आनंदवार्ता : आता विद्यार्थ्यांना पीएमपी कार्यालय स्थानकात जाण्याची गरज नाही, परिसरातच मिळणार 'ही' सुविधा
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘फिरते पास केंद्र’ हा उपक्रम हाती घेतला आहे. ...अधिक वाचा
मुख्यमंत्री निधीचा वापर त्याच्या उद्देशासाठीच करा, उच्च न्यायालयाचे आदेश
मुख्यमंत्री निधीचा वापर केवळ आणि केवळ नैसर्गिक आपत्ती आणि तत्सम घटनेतील पीडितांना मदत करण्यासाठी केला जायला हवा. ...अधिक वाचा
मुंबई : कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या अडीचशे जणांवर कारवाई, महिनाभरात १ लाख २४ हजारांचा दंड वसूल
कबुतरांची पिसे व त्यांच्या विष्ठेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने मुंबईतील कबुतरखान्यांवर महानगरपालिका प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येत आहे. ...अधिक वाचा
Dadar Kabutarkhana: दादरच्या कबुतरखान्याजवळ राडा, जैन समाज आक्रमक; ताडपत्री काढली, आत घुसले आंदोलक!
Dadar Kabutarkhana: दादरच्या कबुतरखान्याजवळ आज सकाळी जैन समुदायाकडून आक्रमक आंदोलन करण्यात आलं. ...अधिक वाचा
फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाने बनावट कॉल सेंटर, शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक
गोरेगाव पश्चिमेच्या राम मंदिर येथील अस्मी कॉम्प्लेक्स मधील एका कार्यालयात फॉरेक्स ट्रेडींग करणारे एक बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाली होती. ...सविस्तर वाचा
देशातील मत्स्योत्पादन घटले मात्र, राज्यातील वाढले… सविस्तर वाचा, असं नेमकं का झालं?
पश्चिम बंगालने ३५ टक्के, तमिळनाडूने २० टक्के तर ओडिशाने १८ टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. ...सविस्तर बातमी
बनावट सीसी, ओसीचा गंडा; नवी मुंबईतही घर खरेदीदारांची बोगस प्रमाणपत्रे देऊन फसवणूक
नवी मुंबईतही बोगस बांधकाम परवानगी तसेच भोगवटा प्रमाणपत्र तयार करून ग्राहकांना गंडा घातला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
...सविस्तर बातमी
बनावट सीसी, ओसीचा गंडा; नवी मुंबईतही घर खरेदीदारांची बोगस प्रमाणपत्रे देऊन फसवणूक
नवी मुंबईतही बोगस बांधकाम परवानगी तसेच भोगवटा प्रमाणपत्र तयार करून ग्राहकांना गंडा घातला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
...सविस्तर बातमी
एसटी महामंडळात नोकरी हवी? अर्ज कसा कराल, जाणून घ्या सविस्तर…
नुकतेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ...अधिक वाचा
Jitendra Awhad : जेव्हा जितेंद्र आव्हाड शिट्ट्या वाजवून कार्यकर्त्यांसोबत नाचतात, म्हणाले, "सेलिब्रेशन तो बनता है…"
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड हे माध्यमांमध्ये त्यांच्या वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. ...वाचा सविस्तर
मराठी चित्रपट योग्य दरात घेण्याची नेटफ्लिक्सला सूचना : ॲड. आशिष शेलार
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा वरळी येथील एनएससीआय डोम येथे सुरू आहे. याप्रसंगी ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. ...अधिक वाचा
कपड्याच्या दुकानाचे बार आणि वाईन शॉपमध्ये रुपांतर; कमला मिलमधील ‘लिव्हिंग लिक्विड’वर मुंबई महापालिकेची कारवाई
तळमजला आणि पहिल्या मजल्यावर कपड्याच्या दुकानाऐवजी उपाहारगृह, बार, वाईन शॉप आणि तळमजल्यावर टेलरिंग दुकानाऐवजी उपाहारगृह असा बदल करून अनधिकृतरितीने चालवत असल्यामुळे मुंबई महापालिकेने ही कारवाई केली आहे. ...सविस्तर वाचा
मुंबई-नांदेड राज्यराणी एक्स्प्रेसचा प्रवास स्वस्त होणार?
भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे विभागातील नांदेड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर राज्य राणी एक्स्प्रेस धावते. नांदेड ते मुंबई असा ६१० किमीचा प्रवास १२.०७ तासांत ही एक्स्प्रेस पूर्ण करते. ...अधिक वाचा
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. अनेक भागात ३३ अंशापुढे तापमान नोंदले जात आहे. ...अधिक वाचा
गणेशोत्सवात यंदा कृत्रिम तलावांवर मूर्ती विसर्जनाचा भार; विभाग कार्यालयांचे काम वाढणार
न्यायालयाने सहा फुटांवरील गणेशमूर्तींनाच नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनाला परवानगी दिली आहे. त्यामुळे सहा फुटांच्या आतील सर्वच घरगुती गणेशमूर्तींचे यंदा कृत्रिम तलावात विसर्जन करावे लागणार आहे. ...सविस्तर वाचा
हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत; ब्लॉकमुळे शनिवारपर्यंत लोकल वेळापत्रकात बदल
हार्बर मार्गावरील वाशी येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (इलेक्ट्रॉनिक सिग्नल नियंत्रण प्रणाली) सुरू करण्याच्या कामासाठी बुधवारी रात्रीपासून शनिवारी रात्रीपर्यंत ब्लाॅक घेण्यात येणार आहे. ...सविस्तर वाचा
ओला, उबर ॲपला 'छावा राईड' टक्कर देणार? एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार
टॅक्सी चालकांनी उबर ॲपवर बहिष्कार टाकला होता. या सर्व वातावरणात राज्य सरकारने 'छावा राईड' नावाचे ॲप सरू केले आहे. त्यामुळे ओला, उबर या ॲपला छावा राइडची स्पर्धा असेल. ...अधिक वाचा
विनातिकीट प्रवाशांची धरपकड; दंड वसुलीद्वारे पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत ७१ कोटींची भर
पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने एप्रिल - जुलै २०२५ या कालावधीत अनेक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. या मोहिमांमध्ये ७०.९८ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. ...अधिक वाचा
पावसाअभावी उकाड्याने मुंबईकरांची काहिली
मागील काही दिवसांपासून मुंबईच्या वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. मध्येच ढगाळ वातावरण, तर मध्येच उन्हाचा ताप. यामुळे मुंबईत उकाडा वाढला आहे. ...अधिक वाचा
अखेर अंबरनाथचे न्यायालय सुरू होणार; ९ ऑगस्टचा मुहुर्त, पोलीस, नागरिकांना मिळणार दिलासा
येत्या ९ ऑगस्ट रोजी या न्यायालयाचे उद्घाटन होणार आहे. त्याच दिवशी येथे कामकाजही होणार असल्याची माहिती आहे. ...वाचा सविस्तर
Jitendra Awhad : तुळजापूर मंदीर प्रकरणावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “ महाराष्ट्रासह शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी म्हणून…
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. ...सविस्तर बातमी
एसटीच्या स्थानक परिसरातील काँक्रीटीकरणाच्या कामाचा बोजवारा
एमआयडीसीकडून ५०० कोटी रुपये निधी जाहीर करण्यात आला होता. एसटी आगार काँक्रीटीकरणाच्या निविदा प्रक्रियेमध्ये एसटीचा कुठलाही सहभाग नसल्याने त्यावर महामंडळाचे नियंत्रण नव्हते. ...वाचा सविस्तर
मेट्रो कामादरम्यान निष्काळजीमुळे प्रवाशाच्या डोक्यात लोखंडी रॉड शिरला
तरुणाच्या उपचाराचा सर्व खर्च केला जात असून कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिली. ...सविस्तर बातमी
अभ्यासाचा आला कंटाळा… अल्पवयीन मुलीने सोडले घर… रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुरक्षित सापडली
पीडित मुलगी १५ वर्षांची असून मुळची बीड जिल्ह्यातील आहे. तिच्या पालकांनी तिला शिक्षणासाठी पालघर येथे राहणाऱ्या काकांकडे पाठवले होते. ...सविस्तर वाचा
मुंबई विमानतळावरून ६.४१ कोटींचा गांजा आणि सोने जप्त
३ ऑगस्ट व ४ ऑगस्ट रोजी केलेल्या दोन कारवायांमध्ये दोन व्यक्तींना अटक करण्यात आली. याप्रकरणात आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे. ...सविस्तर वाचा
गायमुख घाटातील वाहतूक ८ ऑगस्ट पासून अंशतः बंद; खड्डेभारणीचे काम टप्प्या टप्प्याने केले जाणार
रस्ते दुरुस्ती वाहतूक कोंडी संदर्भात उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शुक्रवार ८ ऑगस्ट पासून येथील रस्ते वाहतूक अंशतः बंद करण्यात येणार असल्याचें जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...सविस्तर वाचा
डोंबिवलीत निळजे येथे अल्पवयीन दुचाकी स्वाराच्या धडकेत वृध्द ठार
तक्रारदार संतोष शिरपूरकर हे रिक्षा चालक आहेत. ते निळजे येथील लोढा हेवन भागात राहतात. ...सविस्तर वाचा
तीन वर्षांच्या मुलीवर विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल, मनसे आक्रमक म्हणाले, बदलापूर घटनेची….
मुंबई शहरात संबंधित मुलगी राहते. ती ठाण्यातील एका नामांकित शाळेत शिकते. काही दिवसांपूर्वी मुलीने तिच्या आईला विनयभंगाची माहिती दिली होती. ...अधिक वाचा
मुंबई पुणे नागपूर न्यूज