Mumbai Live Updates, 25 July 2025 : मुंबई शहर आणि उपनगरांत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारी पहाटेपासून अनेक भागात संततधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.शहर आणि उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासून संततधार पाऊस कोसळत आहे. शहरातील परळ, कुलाबा, वरळी भागात पावसाचा जोर वाढला आहे. उपनगरातील वांद्रे, अंधेरी परिसरात देखील पाऊस कोसळत आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांनी व्यक्त केलेली नापसंती तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुढील आठवड्यात चर्चा केल्यावर निर्णय घेण्याची घेतलेली भूमिका यामुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर गंडांतर येणार की त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले जाणार याचीच आता चर्चा सुरू झाली आहे.विधान परिषद सभागृहाचे कामकाज सुरू असतामा भ्रमणध्वनीवर कोकाटे हे रमी खेळत असल्याच्या चित्रफीती समोर आल्या. त्यावरून विरोधकांनी कोकाटे यांची कोंडी केली आहे. त्यातचट कोकाटे यांनी सरकारला भिकाऱ्याची उपमा दिली. यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. 

या घडामोडींसह मुंबई,  मुंबई महानगर, नागपूर आणि पुणे शहर परिसरातील ताज्या बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या…

Live Updates

Pune Nagpur Mumbai Breaking News Live Updates in Marathi

20:40 (IST) 25 Jul 2025

वाकोला उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे प्रवास तापदायक; वारंवार दुरुस्तीनंतरही रस्त्याची दुरावस्था

या उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने नाव काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात येत आहे. ...सविस्तर वाचा
20:27 (IST) 25 Jul 2025

नरेंद्र मोदींची छबी असलेला नेकलेस घालणाऱ्या अभिनेत्रीची फसवणूक; निर्मात्याने केली २४ लाखांची फसवणूक

सोनी टीव्हीमधील मालिकेत, तसेच सिनेमात पैसे गुंतविण्यास सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे. ...अधिक वाचा
20:09 (IST) 25 Jul 2025

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून १७ तरूणांची ६७ लाखांची फसवणूक; आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

आरोपीने हरियाणा, पंजाब, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यातील एकूण १७ जणांची ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणीही हरियाणामध्ये गुन्हा दाखल आहे. ...सविस्तर बातमी
20:01 (IST) 25 Jul 2025

शिवडी रामटेकडी येथील गृहसंकुलातील जुना पिंपळ वृक्ष हटवला

सोसायटीने जागा मोकळी करण्याच्या उद्देशाने हे झाड तोडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. ...सविस्तर वाचा
19:45 (IST) 25 Jul 2025

रत्नागिरीत रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसला (गाडी क्रमांक १२६१९) धडक बसून एका मादी बिबट्याचा मृत्यू झाला. ...सविस्तर वाचा
19:24 (IST) 25 Jul 2025

एका क्लिकवर विद्यार्थ्यांना मिळणार नोकरी आणि इंटर्नशिप्सची माहिती; मुंबई विद्यापीठाच्या ई-समर्थ संकेतस्थळावर ‘प्लेसमेंट आणि ट्रेनिंग’ मॉड्यूल सुरू

मुंबई विद्यापीठाने नव्याने सुरु केलेले हे माध्यम विद्यार्थ्यांसाठी आणि उद्योग क्षेत्रासाठी एक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम व्यासपीठ म्हणून उपलब्ध होणार आहे. ...वाचा सविस्तर
19:13 (IST) 25 Jul 2025

मुंबईतील जोतिबा फुले मंडईचा तिढा सुटेना...

छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मासळी विक्रेत्यांचे महात्मा जोतिबा फुले मंडईच्या पुनर्विकास प्रकल्पातील इमारतीमध्ये कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येत आहे. ...सविस्तर बातमी
18:59 (IST) 25 Jul 2025

म्हाडाचे १५ कोटी दस्तऐवज आता एका क्लिकवर उपलब्ध

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) म्हाडाशी संबंधित तब्बल १५ कोटी दस्तऐवज आता घरबसल्या पाहता येणार आहेत. ...सविस्तर बातमी
18:14 (IST) 25 Jul 2025

पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अभ्यास न करताच डोंगरी कारशेडसाठी वृक्षतोड

ही वृक्षतोड बेकायदा असल्याचा आरोप करीत वृक्षतोड तात्काळ थांबविण्याची, तसेच कारशेड इतरत्र हलविण्याची मागणी होत आहे. ...अधिक वाचा
17:57 (IST) 25 Jul 2025

आता आंदोलन नाही, थेट काचा फुटतील... अमेय खोपकर यांचा मल्टीप्लेक्स मालकांना इशारा

माझ्या चित्रपटासाठी मलाच आंदोलन करणे पटत नाही, मात्र मराठीची गळचेपी करून मराठी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये लागत नसतील तर थेट काचाच फुटतील, असा इशारा त्यांनी मल्टीप्लेक्स मालकांना दिला आहे. ...अधिक वाचा
17:48 (IST) 25 Jul 2025

मुसळधार पावसामुळे पुन्हा उपनगरे जलमय

अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांचा खोळंबा झाला. तसेच, साचलेल्या पाण्यातून वाट काढताना पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. ...सविस्तर बातमी
17:46 (IST) 25 Jul 2025

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, “निवृत्त झाल्यानंतर कुठलेही शासकीय पद स्वीकारणार नाही”,

आपण पदावरून निवृत्त झाल्यानंतर कुठलेही शासकीय पद स्वीकारणार नाही, असे वक्तव्य भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले आहे. ...सविस्तर वाचा
17:37 (IST) 25 Jul 2025

दोन दिवसांच्या मुसळधारांमुळे पावसाच्या सरासरीत वाढ

विशेषत: पश्चिम आणि मध्य उपनगरांत पावसाची नोंद झाली असून, हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात १ ते २५ जुलैपर्यंत ६६३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...अधिक वाचा
17:32 (IST) 25 Jul 2025

शासकीय विद्यालयाकडूनच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना?… सुट्टीच्या आदेशानंतरही विद्यालय….

हवामान विभागाने २५ जुलै रोजी भंडारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी आज जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली.तरी भंडारा परिचर्या प्रशिक्षण विद्यालय (शासकीय नर्सिंग विद्यालय) आज नियमितपणे सुरू होते. ...अधिक वाचा
17:28 (IST) 25 Jul 2025

ज्येष्ठ नाट्यनिर्माते दिलीप जाधव यांना ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’

प्रसिद्ध साहित्यिका आणि संस्थेच्या वार्षिकोत्सवाच्या अध्यक्षा मोनिका गजेंद्रगडकर यांच्या हस्ते दिलीप जाधव यांना ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. ...सविस्तर वाचा
16:55 (IST) 25 Jul 2025

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराप्रकरणी वडिलांसह दोघांविरोधात गुन्हा

याप्रकरणी पीडित मुलीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार केल्यांनतर बलात्कार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ...अधिक वाचा
16:29 (IST) 25 Jul 2025

रोहित पवार रूपेरी पडद्यावर अवतरणार; ‘अवकारीका’ चित्रपटात झळकणार

समाजाला त्यांच्या श्रमाची जाणीव व्हावी, स्वच्छतेसंदर्भात प्रभावीपणे जागरूकता निर्माण व्हावी याच संकल्पनेतून आणि भावनेतून ‘अवकारीका’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी
16:19 (IST) 25 Jul 2025

पालघरला 'रेड अलर्ट'चा इशारा; उद्या शाळा-महाविद्यालये बंद, धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढला

सकाळी ११ वाजता तानसा धरणाचे एकूण २० दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून सकाळी ११ वाजता २२,१०० क्युसेक आणि दुपारी ३ वाजेपर्यंत २३,२१०.४६ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. ...सविस्तर बातमी
16:13 (IST) 25 Jul 2025

नवी मुंबई विमानतळाला २८५ पोलिसांचे बळ; गृहविभागाची २८५ पद भरतीसाठी मान्यता

विमानतळावरील चेकपोस्टसाठी ही पदे असणार आहेत. त्यासाठी १० कोटी १० लाख ८८ हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे पद भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ...वाचा सविस्तर
16:11 (IST) 25 Jul 2025

जुन्या मोडकळीस आलेल्या एक हजार एसआरए इमारतींचा पुनर्विकास

या पुनर्वसित इमारतींचा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याचा निर्णय नुकत्याच लागू करण्यात आलेल्या गृहनिर्माण धोरणाअंतर्गत घेण्यात आला आहे. ...वाचा सविस्तर
16:06 (IST) 25 Jul 2025

लाचखोरीवरून मनसेचे राजू पाटील यांची कडोंमपा नियंत्रक राज्यकर्ते, प्रशासनावर टीका

कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे राज्यकर्ते जसे वागत आहेत. त्याच कार्य पध्दतीने त्यांचे कल्याण डोंबिवली पालिकेतील होयबा अधिकारी वागत आहेत. ...सविस्तर वाचा
16:02 (IST) 25 Jul 2025

देशभक्त व्हा! माकपला मुंबई उच्च न्यायालयाचा सल्ला

तुम्ही गाझा आणि पॅलेस्टाईनमधील समस्यांकडे पाहत आहात. तुमच्या स्वतःच्या देशाकडे पाहा. देशभक्त व्हा. ही देशभक्ती नाही, असे न्यायालयाने म्हटले. ...वाचा सविस्तर
15:46 (IST) 25 Jul 2025

पायी चालणा-या वृद्ध व्यक्तीची लुटमार; पनवेलमध्ये चोरीचे सत्र सुरूच...

पनवेल शहरातील चॅनेल रेसिडेन्सी या सोसायटीत राहणारे आणि सरकारी सेवेतून सेवानिवृत्त झालेले ७२ वर्षीय व्यक्ती नित्यनियमाप्रमाणे गुरुवारी तक्का परिसरातील रस्त्यावरून पायी चालत होते. ...वाचा सविस्तर
15:33 (IST) 25 Jul 2025

आम.अनिल परब अर्धवट वकील, त्यांनी योगेश कदम यांचा राजीनामा घेवून दाखवा; माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे आव्हान

योगेश कदम यांचा राजीनामा घेवून दाखवा असे आव्हान माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले आहे. ते खेड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. ...सविस्तर बातमी
15:30 (IST) 25 Jul 2025

ऑनलाईन वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या टोळीला पश्चिम बंगालमधून अटक, पाच पिडीत मुलींची सुटका तर सहाजण अटकेत

राजेशकुमार यादव, दिशेन डांगी, मुकेश राय, शंभू उपाध्याय, मकबूल अन्सारी आणि धिरेंद्र आर्य अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. ...सविस्तर वाचा
15:10 (IST) 25 Jul 2025

चिपळूण रेल्वे स्थानकातील पे अँड पार्कचा ठेका परप्रांतियांना; स्थानिकांवर अन्याय झाल्याने मनसे आक्रमक

महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने अन्याय होवू देणार नाही अशी भूमिका घेणारे पत्र जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी रेल्वे प्रशासना दिले. ...वाचा सविस्तर
15:06 (IST) 25 Jul 2025

मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! रखडलेले रेल्वे प्रकल्प मार्गी लागणार

मुंबई उपनगरीय मार्गावरील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी १६,२०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ...अधिक वाचा
15:02 (IST) 25 Jul 2025

उघड्या दरवाजातून भंगार वेचक महिलेने कर्णफुले पळवले; प्रतिकार केला असता हाताला चावा…

या प्रकरणी दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एका महिलेस अटक केली असून दुसरीचा शोध सुरु आहे. ...अधिक वाचा
14:49 (IST) 25 Jul 2025

पोलिसांच्या १७ वसाहतींऐवजी सात वसाहतीत पुनर्विकास; ‘म्हाडा’कडून प्रस्ताव तयार

या प्रस्तावाला गृहनिर्माण विभागाने प्राथमिक मंजुरी दिली असून गृह विभागाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ही प्राप्त झाले आहे. ...वाचा सविस्तर
14:36 (IST) 25 Jul 2025

ज्येष्ठ नागरिकांच्या गृहनिर्माणाला आता ‘स्वतंत्र दर्जा’! विकासकांनाही चटईक्षेत्रफळात भरघोस सवलत

राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणात ज्येष्ठांसाठी राबविल्या जाणाऱ्या गृहनिर्माण योजनांना स्वतंत्र दर्जा बहाल करण्यात आला आहे. ...अधिक वाचा

heavy rain in mumbai

मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह २५ जुलै २०२५