Mumbai Breaking News Today 11 July 2025 : गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दिल्ली दौऱ्याची मोठी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. ऐन अधिवेशनाच्या गडबडीत उपमुख्यमंत्र्यांनी अचानक दिल्ली गाठल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आमदार रोहित पवार यांनी विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामागे महायुतीमधील अंतर्गत कुरघोड्या कारणीभूत असल्याचा दावा केला आहे.

या बरोबरच राज्यभर विविध ठिकाणी मुसळधार पावसानेही हजेरी लावल्याचे दिसत आहे. दरम्यान, मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर जिल्ह्यातील राजकीय व इतर महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Pune Mumbai Nagpur Latest News Updates in Marathi

20:36 (IST) 11 Jul 2025

पश्चिम रेल्वेवर शनिवारी, तर मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लाॅक

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर, रेल्वे रूळांची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी आणि इतर अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. ...सविस्तर बातमी
18:29 (IST) 11 Jul 2025

डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर एक्सप्रेसमध्ये लैंगिक अत्याचार करणारा अकोल्यातील तरूण अटक

गजानन सदाशिव चव्हाण (२०) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. तो मूळचा अकोला जिल्ह्यातील शेकापूर गावचा रहिवासी आहे. ...अधिक वाचा
18:20 (IST) 11 Jul 2025

‘कौन बनेगा करोडपती’च्या सतराव्या पर्वाचा प्रोमो समोर; अमिताभ बच्चन म्हणतात…

महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा सूत्रसंचालन करताना दिसणार असून ‘जहां अकल है, वहां अकड है’ असे म्हणत पहिलीवहिली झलक समोर आली आहे. ...सविस्तर वाचा
18:06 (IST) 11 Jul 2025

पुणे:.....आता तरी आयटी हब हिंजवडीत सुधारणा होणार का?; २०१८ सारखंच...! की तोच कित्ता गिरवला जाणार?

हिंजवडी आयटी पार्कमध्ये उदभवलेल्या समस्यांमुळे सरकारची बदनामी झाली, हे निश्चितच आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेऊन हिंजवडी येथे दौरा केला होता. ...अधिक वाचा
17:58 (IST) 11 Jul 2025

नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपीला अखेर जामीन....पोलिसांनी तर देशद्रोहाचा गुन्हा....

नागपूर हिंसाचारानंतर १८ मार्च रोजी पोलिसांनी फहीम खानला अटक केली होती. तेव्हापासून फहीम खान पोलिसांच्या ताब्यात आहे. ...अधिक वाचा
17:55 (IST) 11 Jul 2025

‘आयएमए’ने बंदचा इशारा दिल्याने सरकारकडून अभ्यास समिती स्थापन

२०१४ मध्ये महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या अधिनियमामध्ये सुधारणा करून आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये व्यवसाय करण्याची परवानगी दिली. ...सविस्तर वाचा
17:41 (IST) 11 Jul 2025

आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा

संजय गायकवाड यांच्याविरोधात कलम ११५ (२), ३५२, आणि ३(५), कलमाअंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...वाचा सविस्तर
17:36 (IST) 11 Jul 2025

शहा-शिंदेंच्या भेटीचा प्रश्नच उद्भवत नाही, खासदार नरेश म्हस्केंचा दावा; संजय राऊतांवरही आगपाखड

मागील दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. ...सविस्तर बातमी
17:30 (IST) 11 Jul 2025

१४ वर्षांच्या मुलाकडून मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार, मुलगी दोन महिन्यांची गरोदर

भिवंडी येथे १४ वर्षीय मुलगा राहतो. त्याच भागात पिडीत १४ वर्षीय मुलगी देखील राहते. ...सविस्तर वाचा
17:24 (IST) 11 Jul 2025

PCMC : थकबाकीदार रडारवर; ३४ हजार ७६९ मालमत्ताधारकांना जप्तीपूर्वी नोटीस

१८ विभागीय कार्यालयांमार्फत  ३४ हजार ७६९ मालमत्ताधारकांना जप्तीपूर्वी नोटीस बजावण्यात आली असून या मालमत्ताधारकांकडे १६० कोटी रुपयांची थकबाकी आहे. ...वाचा सविस्तर
17:11 (IST) 11 Jul 2025

वृद्धेच्या गळ्यातील ११ तोळ्यांचे दागिने दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी खेचले

याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात वृद्धेने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला आहे. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये नऊ तोळ्याचा सोन्याचा हार, दीड तोळ्याचे मंगळसूत्र आणि नऊ ग्रॅम सोनसाखळी अशा दागिन्यांचा सामावेश आहे. ...सविस्तर वाचा
16:58 (IST) 11 Jul 2025

अ. भा. मराठी नाट्य परिषदेतर्फे राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा

‘नाट्य परिषद करंडक’ स्पर्धा प्राथमिक व अंतिम फेरी अशा दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. २३ आणि २४ ऑगस्ट रोजी विविध केंद्रांवर प्राथमिक फेरी पार पडणार आहे. ...अधिक वाचा
16:56 (IST) 11 Jul 2025

डोंबिवली बेकायदा बांधकाम गुन्ह्यातील भूमाफियांची नावे पोलिसांनी वगळली; आझाद मैदानात तक्रारदाराचे बेमुदत उपोषण

याप्रकरणात एका वकिलासह सहा भूमाफियांची नावे गुन्ह्यातून वगळण्यात आली आहेत. ...वाचा सविस्तर
16:40 (IST) 11 Jul 2025

पार्टीसाठी आल्यानंतर फार्महाऊसवर गोळीबार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश याने पार्टीदरम्यान स्वतःकडील पिस्तुलमधून दोन वेळा हवेत गोळीबार केला. यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली. ...अधिक वाचा
16:34 (IST) 11 Jul 2025

कोन, पनवेलमधील विजेत्या गिरणी कामगारांना दिलासा; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी कोन, पनवेलमधील २०१९ पासून २०२४ पर्यंत घराची रक्कम भरलेल्या विजेत्या गिरणी कामगार, वारसांचे दोन वर्षांचे सेवाशुल्क माफ केले आहे. ...अधिक वाचा
16:26 (IST) 11 Jul 2025

आयटीनगरी हिंजवडीत घरगुती गॅसचा काळाबाजार, पाच जण अटकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे घरगुती गॅस सिलेंडरमधून धोकादायक पद्धतीने व्यावसायिक सिलेंडर मध्ये गॅस भरत होते. त्या सिलेंडरची बाजारात चढ्या दराने विक्री केली जात होती ...सविस्तर बातमी
16:17 (IST) 11 Jul 2025

पुनर्वसनातील रहिवाशांना महारेरा संरक्षण नाही! 

पुनर्वसनातील रहिवाशांना महारेराची दारे बंद असल्यामुळे आता महाराष्ट्र ओनरशिप ॲाफ फ्लॅट कायद्यानुसार (मोफा) दाद मागावी लागणार आहे. ...अधिक वाचा
16:17 (IST) 11 Jul 2025

पदपथांवर असलेल्या हरित कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त

पावसामुळे ठाणे शहरात गेल्या महिन्याभरात २७ ठिकाणी वृक्ष उन्मळून तर, पाच ते सहा ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाडे नोंदविण्यात आली आहे. ...सविस्तर वाचा
15:57 (IST) 11 Jul 2025

कासारवडवली कोंडीतून दिलासा, पण गायमुख घाटात कोंडी

घोडबंदर मार्गावरील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या कासारवडवली येथील उड्डाणपूलाची मार्गिका खुली झाल्याने कासारवडवली चौकात होणाऱ्या वाहतुक कोंडीतून वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...सविस्तर वाचा
15:55 (IST) 11 Jul 2025

ॲप आधारित वाहनांनी कायद्याचे पालन करावेच लागले - प्रताप सरनाईक

खासगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बस, मोटारगाडी, बाइक टॅक्सी यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. ...अधिक वाचा
15:47 (IST) 11 Jul 2025

करवाढीविरोधात हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेचा बंद !

वर्षभारत सरकारने विविध करांमध्ये मोठी वाढ केली असल्याने आतिथ्य सेवा उद्योग मोठ्या आर्थिक नुकसानीला समोर जात असल्याचे मत संघटनेकडून व्यक्त करण्यात आले आहेत. ...अधिक वाचा
15:47 (IST) 11 Jul 2025

सीबीआयचा वापर क्लीनचिटसाठीच? अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सीबीआयने दोन गुन्ह्यात क्लीन चिट दिली आहे. तेव्हाच त्यांना क्लीनचिट मिळणार हे निश्चित झाले होते, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. ...अधिक वाचा
15:29 (IST) 11 Jul 2025

पालघरमध्ये उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय...

पालघर जिल्ह्यात यंदा आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक ग्रंथालय उभारण्यात येणार असून या उपक्रमामुळे जिल्ह्याची नव्याने ओळख निर्माण होईल असा विश्वास इस्कॉनचे अध्यक्ष आणि अध्यात्मिक गुरू गौरांगदास प्रभू यांनी व्यक्त केला. ...वाचा सविस्तर
15:16 (IST) 11 Jul 2025

ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार दखलपात्र गुन्हा...

या कार्यक्रमावेळी ॲड. प्रमोद ढोकलेंनी ज्येष्ठ नागरिकांच्या अत्याचाराची व्याख्या, कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधक कायदे यांची सखोल माहिती उपस्थितांना दिली. ...अधिक वाचा
15:05 (IST) 11 Jul 2025

टिटवाळा महागणपती मंदिराजवळील कडोंमपाच्या वाहनतळावर चिखल

काही दुर्घटना घडण्यापूर्वी पालिकेने या वाहनतळावरील गाळ, चिखल काढून टाकण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे. ...सविस्तर बातमी
14:51 (IST) 11 Jul 2025

पुणे : महापालिका आयुक्त मध्यरात्री बाहेर पडतात तेव्हा..!

शहरातील रस्ते स्वच्छ करण्याचे आदेश देऊन केवळ महापालिका आयुक्त थांबले नाहीत. ...वाचा सविस्तर
14:50 (IST) 11 Jul 2025

कॅफे गोळीबार प्रकरण…ओशिवरा पोलीस कपिल शर्माच्या निवासस्थानी

हास्य अभिनेता कपिल शर्मा याच्या कॅनडा येथील कॅफेवर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी समांतर तपास सुरू केला आहे. ...अधिक वाचा
14:48 (IST) 11 Jul 2025

नरेश म्हस्के, किरीट सौमय्यासह सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा नौपाडा पोलीस ठाण्यात चार तास ठिय्या

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एक संस्था होती. या संस्थेमध्ये संजय वाघुले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह तक्रारदार डॉक्टर यांना डांबून ठेवल्याचा आरोप आहे. ...सविस्तर बातमी
14:40 (IST) 11 Jul 2025

नवी मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना दिलासा, बिल्डरांकडून हमीपत्र घेऊन बांधकाम परवानगी देण्याचा मार्ग खुला

पर्यावरण विभागाचा ‘ना हरकत’ दाखला मिळत नाही तोवर शहरातील कोणत्याच बांधकामांना परवानगी देऊ नये असे राज्य सरकारचे आदेश होते. ...सविस्तर वाचा
14:30 (IST) 11 Jul 2025

भाड्याच्या घराचा शोध महागात पडला…तब्बल तीन लाखांची फसवणूक…

आरोपीने तत्काळ नटराजन यांना एक बँक खाते क्रमांक पाठवून त्यावर २ लाख ८० हजार रुपये पाठवण्यास सांगितले. नटराजन यांनी खात्री न करताच आरोपीने दिलेल्या बँक खात्यात पैसे पाठवले. ...सविस्तर वाचा

Mumbai Nagpur Pune Breaking News Live Updates in Marathi

मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह ११ जुलै २०२५