Mumbai Pune Monsoon Updates: आपल्या ७० वर्षांच्या आजारी आजीला आरे परिसरातील रस्त्याच्या कडेला सोडून जाणाऱ्या नातवासह तिघांविरोधात आरे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आजी स्वत: घर सोडून गेल्याचा दावा नातवाने केला होता. पोलिसांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी केल्यानंतर नातवानेच शनिवारी पहाटे आजीला रिक्षातून आरेच्या जंगलात सोडल्याचे उघड झाले.

पुण्यातील लोहगाव परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तीन लाख रुपयांचा १२ किलो गांजा जप्त करण्यात आला. अखिलेश गरीब मंडल (वय ३४, रा. लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूर शहरात चोहोबाजूंनी सिमेंट रस्ते आणि उड्डाणपुलांचे जाळे विस्तारले जात आहे. मात्र प्रत्यक्षात अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसागणिक वाढतच आहे. शहर आणि परिसरात २०२० ते २०२५ या पाच वर्षांत ५४१७ प्राणांतिक अपघातांची नोंद झाली. यात दीड हजारावर लोक ठार झाले. 

मुंबई, मुंबई महानगरातील, पुणे शहर आणि परिसर तसंच नागपूर शहराशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या blog च्यामाध्यमातून मिळेल.

Live Updates

Pune Nagpur Mumbai Breaking News Updates in Marathi

18:39 (IST) 26 Jun 2025

"भिवंडी - वाडा" महामार्गावर ७ तासांपासून श्रमजीवी संघटनेचा रास्ता रोको

मागील १२ वर्षात या रस्ता दुरुस्तीसाठी शासनाने विविध एजन्सी माध्यमातून कंत्राट देऊन आतापर्यंत जवळपास ८०० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला. मात्र तरीही रस्ता सुस्थितीत झाला नाही. ...वाचा सविस्तर
18:18 (IST) 26 Jun 2025

रुग्णवाहिकेची कुत्र्याला धडक अन् जीव गेला रुग्णाचा…

राग, अहंकार यापुढे माणुसकी संपत चालली आहे. इतरांच्या दुःख, वेदना याची जाणीव देखील अनेकांना राहिली नाही. अशाच एका संतापजनक घटनेचा प्रत्यय अकोला जिल्ह्यात आला. ...सविस्तर वाचा
18:18 (IST) 26 Jun 2025

बुलढाणा: मुसळधारेने अनेक भागांत पूरस्थिती! नदी, नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; पेरण्या…

कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्यातील पाच लाख शेतकरी आणि लाखो रहिवासी यांना दमदार पावसाची अपेक्षा होती. काल सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर कोसळधार पावसाने हजेरी लावली. ...सविस्तर बातमी
17:58 (IST) 26 Jun 2025

जुन्या ठाण्यात घरगुती गॅस जोडणी न दिल्यास कारवाई; खासदार नरेश म्हस्के यांचा महानगर गॅस कंपनीला इशारा

काही ठिकाणी गॅस वाहिनीच टाकण्यात आलेली नाही. तर काही ठिकाणी गॅस वाहीनी जोडणीत मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. काही सोसायट्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून देखील जोडणी झालेली नाही, अशा तक्रारी रहिवाशांनी बैठकीत मांडल्या. ...अधिक वाचा
17:49 (IST) 26 Jun 2025

डोंबिवलीतील विकास म्हात्रे यांचा भाजपला रामराम, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाण्याचे संकेत

गेल्या दीड वर्षापासून विकास म्हात्रे भाजपमध्ये अस्वस्थ होते. वेळोवेळी त्यांनी विविध कारणांवरून आपली नाराजी व्यक्त केली होती. ...अधिक वाचा
17:01 (IST) 26 Jun 2025

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग; आतापर्यंत ९० गावांची संयुक्त मोजणी पूर्ण

तीन महिन्यांत संयुक्त मोजणीचे काम पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन ...सविस्तर वाचा
16:57 (IST) 26 Jun 2025

गोखीवरे फादरवाडी येथे भंगार गोदामाला भीषण आग

वसई पूर्वेच्या गोखीवरे फादर वाडी येथील एका भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली. ...सविस्तर बातमी
16:33 (IST) 26 Jun 2025

डोंबिवली एमआयडीसीत सीमेंट काँक्रीटचा नवीन रस्ता तोडला

रस्त्यासाठी शासनाने लाखभर रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे या रस्त्याची तोडफोड प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. ...सविस्तर वाचा
16:27 (IST) 26 Jun 2025

किरीट सोमय्या यांचे आता भोंगामुक्त महाराष्ट्र अभियान! म्हणाले मुंबई पोलीस…

भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांचे  गुरुवारी , २६ जून रोजी  बुलढाणा शहरात दुपारी आगमन झाले. ...सविस्तर बातमी
16:26 (IST) 26 Jun 2025

सूर्या केमिकल कंपनीत छत कोसळून तरूणी ठार, सहा कामगार जखमी

झरी तालुक्यातील गणेशपूर येथे  सूर्या केमिकल्स या कंपनीचे छत कोसळून सहा  कामगार त्याखाली दबले. यात एका तरूणीचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ...अधिक वाचा
16:26 (IST) 26 Jun 2025

मुंबईतील १२४ दुकानांच्या ई लिलावासाठी जुलैमध्ये जाहिरात; मागील सोडतीत विकल्या न गेलेल्या दुकानांचा समावेश

म्हाडाच्या मुंबई मंडळाने गेल्या वर्षी १७३ दुकानांचा ई लिलाव केला होता. मात्र या ई लिलावातील दुकनांना प्रतिसाद न मिळाल्याने १७३ पैकी केवळ ४९ दुकानांची विक्री झाली. ...सविस्तर वाचा
16:11 (IST) 26 Jun 2025

महिलेच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना बिहारमधून अटक, ठाणे पोलिसांची कारवाई

यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींचा ७२ तासांत शोध घेऊन त्यांना अटक केली. ...अधिक वाचा
14:16 (IST) 26 Jun 2025

डोंबिवली मानपाडा रस्त्यावरील बेकायदा चहाची टपरी हटवली

स्थानिक नागरिक, व्यापाऱ्यांनी याप्रकरणी आवाज उठविताच पालिकेने ही टपरी बुधवारी जप्त केली आहे. ...सविस्तर बातमी
14:00 (IST) 26 Jun 2025

School Holidays 2025: सुट्ट्यांचे वेळापत्रक! वर्षभरात ' इतक्या ' सुट्ट्या मिळणार

Maharashtra school holidays 2025: सुट्टी हा सर्वांचा आवडीचा विषय. त्यातही शासकीय कार्यालय व शाळा यांना मिळणाऱ्या सुट्ट्या हा चर्चेचा तर अनेकांसाठी असुयेचा विषय बनतो. म्हणून वर्षभरात किती सुट्ट्या येतात व किती निमित्तमात्र मिळणार याचा हिशोब केल्या जात असतो. ...अधिक वाचा
13:44 (IST) 26 Jun 2025

बबनराव लोणीकर यांनी भाजपचा शेतकऱ्यांबद्दलचा दृष्टीकोन सांगितला: विजय वडेट्टीवार

शेतकऱ्यांचे कपडे, चपला, मोबाईल आमच्या पैशातून चालतात', असे भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर म्हणतात. ...वाचा सविस्तर
13:44 (IST) 26 Jun 2025

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’: दैनंदिन प्रवासी संख्येत पुन्हा वाढ; २४ जून रोजी २ लाख ९७ हजार प्रवाशांनी केला प्रवास

‘दहिसर - अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर - गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांच्या दैनंदिन प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ...वाचा सविस्तर
13:44 (IST) 26 Jun 2025

भारतीय लष्करातील लेफ्टनंट कर्नल सायबर जाळ्यात…शोधनिबंध प्रसिध्द करण्याच्या नावाखाली फसवणूक…

आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये शोधनिबंध प्रसिध्द करण्याच्या नावाखाली सायबर भामट्यांनी भारतीय सैन्य दलातील एका लेफ्टनंट कर्नलची सव्वा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. ...अधिक वाचा
13:44 (IST) 26 Jun 2025

निराशेतून बनावट मतदानाचे हास्यास्पद दावे; उच्च न्यायालयाची टिप्पणी

गेल्या नोंव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सहा वाजल्यानंतर सुमारे ७५ लाख मतदारांनी मतदान केले. ...सविस्तर बातमी
13:34 (IST) 26 Jun 2025

डोंबिवलीत कार चालकाने डांबून मारहाण केल्याने मानसिक तणावातून रिक्षा चालकाची आत्महत्या

रिक्षा चालक मुंजाजी शेळके (७०) हे ठाकुरवाडी भागात कुटुंबीयांसह राहत होते. तर आकाश एकनाथ म्हात्रे असे मारहाण करणाऱ्या कार चालकाचे नाव आहे. ...सविस्तर वाचा
13:12 (IST) 26 Jun 2025

'एमपीएससी'वर शरद पवार गटाच्या नेत्याचा मोठा आरोप, थेट जाहिरातच रद्द करण्याची मागणी…

राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दुय्यम निरीक्षक पदासाठी ही पदभरती असून ११५ पदे जवान संवर्गासाठी तर २२ पदे ही लिपिक संवर्गासाठी आहेत. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी आक्षेप घेतला आहे. ...अधिक वाचा
12:08 (IST) 26 Jun 2025

नवी मुंबई : १४ गावांत प्रभागरचनेच्या कामाला गती; स्थानिक, ग्रामसेवकांचे प्रभागरचनेच्या कामासाठी सहकार्य

नवी मुंबई महापालिकेत निवडणुकीच्या कामाबाबतची लगबग सुरू झाली असून पालिका आयुक्तांनी प्रभाग रचनेसाठीच्या समितीची स्थापना केली आहे तर दुसरीकडे १४ गावांचाही सहभाग असल्याने तेथील प्रभागरचनेच्या कामालाही गती आली आहे. ...सविस्तर वाचा
11:56 (IST) 26 Jun 2025

समुद्रावर जाताय, सांभाळा…समुद्राला आज दुपारी मोठी भरती, सुमारे चार मीटर उंच लाटा उसळणार

गुरुवारी दुपारी १२.५५ च्या सुमारास समुद्राला मोठी भरती येणार आहे. या कालावधीत सुमारे ४.७५ मीटरच्या उंच लाटा उसळणार आहेत. ...अधिक वाचा
11:41 (IST) 26 Jun 2025

नोकरशाहीच्या उदासीनतेमुळे आठ महिन्यांपासून तरूण बेरोजगार, न्यायासाठी उच्च न्यायालयात धाव

भरती प्रक्रिया पूर्ण करूनही, अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे आपण उपजीविकेपासून वंचित असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. ...सविस्तर वाचा
11:26 (IST) 26 Jun 2025

सरकारवर टीका करणारे साहित्यिक, इतिहासकारांचे आणीबाणीबाबत मौन का? भाजपचा आरोप

आणीबाणीला ५० वर्ष झाल्यानिमित्त भाजपच्या वतीने संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सहस्त्रबुद्धे बोलत होते. ...अधिक वाचा
11:26 (IST) 26 Jun 2025

ठाकरे गटाचे अनंत नर यांची आमदारकी कायम; उच्च न्यायालयाचा निर्णय, अपक्ष उमेदवाराला साडे तीन लाखांचा दंड

विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत नर यांनी ७७,०४४ मतांनी विजय मिळवला होता. नर यांनी शिवसेनेच्या मनीषा वायकर (एकनाथ शिंदे) यांचा १,५४१ मतांनी पराभव केला होता. याचिकाकर्ता साटोणे हे अपक्ष उमेदवार होते. ...सविस्तर वाचा
11:20 (IST) 26 Jun 2025

ठाणे जिल्ह्यात पाच हजार हेक्टरवर भाताचा पेरा, एस. आर. टी. पध्दतीच्या भात लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

शेतकऱ्यांनी हळवार (६० दिवसात पीक), गरवी (१२० दिवसात पीक) पध्दतीच्या जमिनीप्रमाणे अस्मिता, शुभांगी, सुवर्णा, ६४-६४, एककाडी, सिकंदर, कर्जत अशा अनेक भात बियाणांची लागवड केली आहे. ...अधिक वाचा

Mumbai Pune Nagpur news live today 26 June 2025, Mumbai Rain Alert,

मुंबई, नागपूर, पुणे न्युज