Maharashtra Rain Updates Live News 28 May 2025 : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या सुनेची आत्महत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली असताना नागपुरात भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबातील प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. आमदार परिणय फुके यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यंदा मोसमी पाऊस जोरदार बरसणार असून त्याची चुणूक पहिल्याच दिवशी मिळाली आहे. यंदा राज्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने मराठवाड्यात सर्वाधिक म्हणजे सरासरीच्या ११२ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरांतील, परिसरांतील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Live Updates

Mumbai Pune Nagpur Breaking News Live Updates, 28 May 2025

22:39 (IST) 28 May 2025

पालखी मार्गावरील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई

आतापर्यंत २१ होर्डिंग काढण्यात आले असून, पुढील दहा दिवसांत उर्वरित अनधिकृत होर्डिंग हटवली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. ...अधिक वाचा
22:30 (IST) 28 May 2025

पुणे शहरात झाडे कोसळण्याची भीती, फांद्या छाटणीकडे महापालिकेचे दुर्लक्ष; २२९ तक्रारी प्रलंबित

आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू फांद्या कोसळल्यामुळे झाला असून, २२९ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. मोठ्या झाडांखालून जाताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...वाचा सविस्तर
22:00 (IST) 28 May 2025

पुण्यात पेशवे उद्यानाजवळ रिक्षावर झाड कोसळून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

गेल्या महिन्यात झाड कोसळण्याच्या २०० हून अधिक घटना नोंदवल्या गेल्या असून, नागरी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...सविस्तर बातमी
21:42 (IST) 28 May 2025

पुण्याच्या पूर रोखण्याच्या क्षमतेत १३ टक्क्यांनी घट… काय आहेत कारणे?

वाढते शहरीकरण, हरित पट्ट्यांचे नुकसान आणि नैसर्गिक परिसंस्थेतील बदल यामुळे पर्यावरणीय समतोल धोक्यात आल्याचा निष्कर्ष ‘एमआयटी विश्वशांती विद्यापीठ’च्या अभ्यासातून समोर आला आहे. ...अधिक वाचा
21:32 (IST) 28 May 2025

मिठी नदी गाळ गैरव्यवहाराप्रकरणः अभिनेता डिनो मोरियाची पुन्हा चौकशी

मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापर प्रकरणात मुंबई पोलिसांनी अभिनेता डिनो मोरियाची पुन्हा चौकशी केली. ...अधिक वाचा
21:08 (IST) 28 May 2025

वारकऱ्यांची पिंपरी-चिंचवडमधील वाट खडतर

पिंपरी-चिंचवड शहरातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सुरू असलेल्या मेट्रो व इतर कामांमुळे रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे पालखी रथ व वारकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ...अधिक वाचा
20:37 (IST) 28 May 2025

संरक्षित स्टार कासव पाळल्याबद्दल ५७ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल

ग्रॅण्ट रोड येथील एका घरावर वन विभागाने केलेल्या कारवाईत भारतीय स्टार कासव जप्त करण्यात आले असून, ईश्वरलाल वाघेला याला अटक करण्यात आली आहे. ...अधिक वाचा
17:55 (IST) 28 May 2025

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे यांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे या दोघांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी, तर शशांक, लता आणि करिश्माला एक दिवसाची पोलिस कोठडी

17:50 (IST) 28 May 2025

मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे कोंडी

वाहन चालकांना पाच ते दहा मिनीटांच्या अंतरासाठी अर्धा तास लागत होता. ...सविस्तर वाचा
17:38 (IST) 28 May 2025

संत बेंडोजी बाबा पायदळ वारीचे पंढरपूरकडे प्रस्थान-९ जुलैला

चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील श्री बेंडोजी बाबा संस्थानतर्फे १३६ वर्षांच्या परंपरेचे पालन करत यंदाही पायदळ वारीचे प्रस्थान झाले आहे. भाविकांसह पायदळ वारी रवाना झाली. ...अधिक वाचा
17:27 (IST) 28 May 2025

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे आळंदीतील ‘स्नेहवन’!

अशोक देशमाने या युवकाने बड्या वेतनाच्या नोकरीवर पाणी सोडत या लहानग्यांना हक्काचे छप्पर मिळण्यासाठी झटू लागला आणि यातूनच उभारले गेले आहे आळंदीनजिकचे ‘स्नेहवन’. ...सविस्तर वाचा
17:27 (IST) 28 May 2025

डोंबिवलीजवळील पिसवलीत उत्तरप्रदेशचा गांजा तस्कर अटकेत

शिवलोचना हंसराज सिंह (२१) असे या तस्कराचे नाव आहे. ...सविस्तर बातमी
17:17 (IST) 28 May 2025

देवाभाऊंना लाडका भाऊ म्हणण्यासारखी स्थिती नाही; प्रिया फुकेंच्या पत्राकडे दुर्लक्ष - सुषमा अंधारेंची टीका

सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबातील पिडीत महिलेला या राज्यात न्याय मिळत नाहीतर इतर महिलांना काय मिळणार, केवळ लाडकी बहिणीची जाहिरात करून काय उपयोग, असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नागपुरातील पत्रकार परिषदेत केला. ...वाचा सविस्तर
16:49 (IST) 28 May 2025

कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस, रस्तोरस्ती पाणी तुंबले

कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयात, उदवाहनात आणि डोंबिवलीत खासदारांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावरील खोलगट भागात गुडघाभर पाणी साचले होते. ...वाचा सविस्तर
16:48 (IST) 28 May 2025

विहीरीत पडून बिबटयाचा मृत्यू ; आगडी येथील घटना

आगडी येथील बाबूराव निकोडे यांचे घरा शेजारी असलल्या विहीरीत रात्रीच बिबटया पडला.बाहेर पडता न आल्याने त्याचा विहीरीतच मृत्यू झाला. ...सविस्तर बातमी
16:37 (IST) 28 May 2025

ठाण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस, अनेक ठिकाणी वृक्ष आणि फांद्या पडले, कळव्यात वीजेचा खांब झाला धोकादायक

कळव्यात वीजेचा लोखंडी खांब वाकल्याने अपघात होण्याची भिती व्यक्त होत होती. ...सविस्तर वाचा
16:09 (IST) 28 May 2025

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत करोनाचे एकूण आठ रूग्ण, दोन करोना बाधित रुग्णांचा मृत्यू

मागील सहा दिवसांच्या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील करोना साथीने बधित रूग्णांची एकूण संख्या आठ झाली आहे. ...सविस्तर बातमी
16:09 (IST) 28 May 2025

टीमा हॉस्पिटल बाबत सद्यस्थिती कायम ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

सध्याची मान्सून परिस्थिती व शहरी भागात करोनाचा झालेला शिरकाव पाहता रुग्णालयाची सद्यस्थिती कायम ठेवण्या संदर्भात सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. ...सविस्तर वाचा
15:49 (IST) 28 May 2025

समाजमाध्यमातील चित्रफितीमुळे चार जणांना अटक, महामार्गावर परस्परांवर हल्ला केल्याची तक्रार

रोहित गोरडे, मयुरी गोरडे (दीक्षित चाळ, भद्रकाली), ऐश्वर्या भुजंग (मुंबईनाका) आणि दिगंबर उर्फ दत्ता आंधळे (कलानगर, दिंडोरी रोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. ...सविस्तर बातमी
15:42 (IST) 28 May 2025

सुरक्षित प्रवासासाठी आता ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित लवकरच स्मार्ट बसगाड्या

बुधवारी ठाण्यात स्मार्ट बसगाडीमधील एआय प्रणालीचे सादरीकरण उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर करण्यात आले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

सविस्तर बातमी...

15:36 (IST) 28 May 2025

गोऱ्हे व मनोर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार, दोन अधिकाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

ग्रामविकास विभागामार्फत दरवर्षी जिल्हास्तरावर अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची निवड करून त्यांचा सन्मान केला जातो. ...अधिक वाचा
15:24 (IST) 28 May 2025

विदर्भ नदीवरील पुरात गाडी वाहून गेली, एकाचा मृत्यू, एक जखमी

उमरी (ता. वणी) येथील भास्कर संभाजी पुसाम आणि रामा उध्दव कणाके हे दोघेजण मंगळवारी रात्री डोंगरगाव येथून परतत होते. ...सविस्तर वाचा
14:09 (IST) 28 May 2025

मयुरी हगवणेप्रमाणेच प्रिया फुकेंच्या तक्रारीची महिला आयोगाने दखल घेतली नाही- सुषमा अंधारे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेच्या आत्महत्या प्रकरणात राजेंद्र हगवणे यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलगी यांना या प्रकरणात अटक केली आहे. ...अधिक वाचा
14:05 (IST) 28 May 2025

बिडकोकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा कायम, ३५ हजार नागरिकांना होते गैरसोय

पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. ...वाचा सविस्तर
13:38 (IST) 28 May 2025

डोंबिवलीत ७२ वर्षाच्या वृध्देला लग्नाचे आमिष दाखवून ६२ वर्षाच्या वृध्दाने ५७ लाखाला फसविले

गेल्या महिन्यात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. ...अधिक वाचा
13:23 (IST) 28 May 2025

नांदेडमध्ये डी पी सावंत पुन्हा भाजपमध्ये

सावंत हे नोव्हेंबर ते मे यादरम्यान काँग्रेस सोबत भाजपामध्येही होते. पण त्याची दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली नाही. ...सविस्तर वाचा
13:06 (IST) 28 May 2025

लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुनरुच्चार

ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी नाशिकच्या माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. ...वाचा सविस्तर
12:40 (IST) 28 May 2025

मुंब्रा-पनवेल मार्गावरील कमानी पुलाखालील सततच्या वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण

शिळफाटा रस्त्यावरील कल्याण फाट्याजवळ जुन्या दत्त मंदिर भागात मुंब्रा पनवेल रस्त्यावर वाहतुक कोंडी टाळण्यासाठी कमानी पुलाची उभारणी करण्यात आली आहे. ...वाचा सविस्तर
12:05 (IST) 28 May 2025

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार व माजी आमदार कॉम्रेड लहानू कोम यांचे दुःखद निधन

गेले १० दिवस कॉम्रेड लहानू कोम एका खासगी इस्पितळात आय.सी.यू. मध्ये होते. ...अधिक वाचा
12:04 (IST) 28 May 2025

शिवसेना ठाकरे गटाची जळगाव महापालिका निवडणुकीसाठी तयारी; संजय राऊत दौऱ्यावर

लोकसभेसह विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये मरगळ आलेली होती. ...सविस्तर वाचा

nagpur mumbai pune latest marathi news today in marathi

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे