मुंबई : घरातील व्यक्ती गाढ झोपेत असल्याची संधी साधून महागड्या वस्तू चोरणाऱ्या महिलेला व्ही. बी. नगर पोलिसांनी अटक केली. अटक महिला सराईत चोर असून तिच्या ताब्यातून पोलिसांनी काही महागडे मोबाइल आणि रोख रक्कम हस्तगत केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कुर्ला पश्चिम येथील एचडीआयल इमारतीमध्ये राहणाऱ्या निकिता श्रीनिवास यांच्या घरात मंगळवारी शिरून सदर महिलेने चोरी केली. महिला सकाळी कामावर निघून गेल्यानंतर तिने घराचा दरवाजा उघडा ठेवला होता. त्यावेळी घरातील सर्वजण गाढ झोपेत होते. हीच संधी साधत आरोपी महिलेने घरात घुसन तीन मोबाइल आणि इतर वस्तू घेऊन पोबारा केला. काही वेळानंतर घरातील व्यक्तींच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेही वाचा – अनिल देसाईंची खासदारकी निर्भेळ, आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

हेही वाचा – छेडानगर जंक्शन अखेर वाहतूक कोंडीमुक्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी तत्काळ याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. यावेळी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासले असता एक संशयित महिला पोलिसांना आढळली. त्यानुसार पोलिसांनी चोरलेल्या मोबाइलच्या लोकेशनच्या आधारे वांद्रे परिसरातून पायल पवार (३०) या महिलेला अटक केली. चौकशीदरमयान तिने गुन्ह्याची कबुली दिली असून तिच्यावर रबाळे, कुर्ला आणि दादर पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती विनोबा भावे नगर पोलिसांनी दिली.