मुंबई उच्च न्यायालयाने आज (सोमवार) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील  ज्ञानदेव वानखेडे यांची मागणी फेटाळली आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य करण्यास किंवा सोशल मीडियावर कोणतीही माहिती प्रकाशित करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना मनाई करावी, अशी मागणी केली होती. न्यायालयाने नवाब मलिक यांना बोलण्याचा अधिकार (right to freedom of speech and expression) असल्याचे सांगत मागणी फेटाळली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी देखील न्यायालयाने सल्ला दिला आहे. “कोणत्याही अधिकाऱ्याबद्दल कोणतेही विधान करण्यापूर्वी माहितीची पडताळणी केली पाहिजे. नवाब मलिक यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, असे या टप्प्यावर म्हणणे योग्य ठरणार नाही. नवाब मालक पोस्ट करू शकतात. परंतु कोणतीही गोष्ट पूर्ण पडताळणीनंतरच पोस्ट करावी.”

समीर वानखेडेंनी मुस्लीमांप्रमाणे गोल टोपी घातलेला फोटो शेअर करत नवाब मलिक म्हणाले, “यह क्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी पुढील सुनावणी आता २० डिसेंबरला होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर नवाब मलिक यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला. त्यांनी लिहिले, “सत्यमेव जयते, अन्यायाविरुद्ध लढा सुरूच राहणार”. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर खंडणी, जात प्रमाणपत्रातील तफावत असे अनेक आरोप केले आहेत. मात्र, एनसीबीच्या अधिकाऱ्याने अनेक वेळा हे आरोप फेटाळून लावले आहेत.