राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी रात्री ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा झटका आला नसल्याचं सांगितलं आहे. अजित पवार धनंजय मुंडेंची भेट घेण्यासाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात पोहोचले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

धनंजय मुंडे यांना मंगळवारी अस्वस्थ्य वाटू लागल्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना सात दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांना भेटण्यासाठी पक्षाचे नेते रुग्णालयात पोहोचत आहे. त्यांच्या बहिणी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेही रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.

A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
male candidates Kalyan
कल्याण लोकसभेत ‘ईडी’ची पीडा टाळण्यासाठी ठाकरे गटाच्या पुरुष उमेदवारांची माघार?
MPSC interview
‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…
Recruitment for posts of Police Constables refusal to grant interim stay to order of extra marks to transgender
पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार

अजित पवार यांनी सांगितलं की, “धनंजय मुंडेंना सौम्य झटका आल्याची बातमी पसरली. पण झटका वैगेरे नाही. डॉक्टर पूर्ण तपासणी करत आहेत. डॉक्टरांनी दोन ते तीन दिवस दवाखान्यात ठेवण्यास सांगितलं आहे. आज त्यांना विशेष रुममध्ये हलवण्यात येईल. सर्व तपासण्या सुरु असून काही राहिल्या आहेत. त्यांना विश्रांती घेण्यास सांगण्यात आलं आहे”.

“काल पक्ष कार्यालयात आणि पवारांकडे असताना त्यांना भोवळ आल्यासारखं झालं. त्यामुळे ते काही काळासाठी बेशुद्ध झाले होते. इथे आणलं तेव्हाही त्यांना शुद्ध नव्हती. एमआरआय वैगेरे झाल्यावर त्यांना शुद्ध आली,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

सुप्रिया सुळेही धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेची प्रकृती स्थिर आणि चांगली असल्याचं त्यांनी सांगितलं. “गेल्या काही दिवसांत त्यांचा फार प्रवास झाला; उष्णता आणि दौरा यामुळे त्यांना थोडा त्रास झाला. पण डॉक्टरच याविषयी जास्त सांगू शकतील. मी धनंजय मुंडे आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. ते सध्या चांगल्या स्थितीत असून ते जास्त महत्वाचं आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ट्विटरवरुन धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. “राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धंनजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही. कामाचा ताण व प्रवास इत्यादीमुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. काल रात्री उशिरा मी त्यांची भेट घेऊन डॉक्टरांशी देखील सविस्तर चर्चा केली आहे,” असं टोपे यांनी ट्विट करुन सांगितलं आहे.

तसेच अन्य एका ट्विटमध्ये टोपे यांनी, “काही काळ आराम करून ते पुन्हा एकदा आधीच्याच उत्साहाने जनतेच्या सेवेत रूजू होतील,” असा विश्वासही व्यक्त केलाय. धनंजय मुंडे हे ४६ वर्षांचे असून कामाच्या दगदगीमुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिलीय.