मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्मचारी आणि मतदारांच्या सोयीसाठी विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. मंगळवार (१९ – २० नोव्हेंबर रोजी) आणि बुधवारी (२० – २१ नोव्हेंबर रोजी) रात्री विशेष लोकल धावणार आहे. या लोकल मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटी – कल्याण, हार्बर मार्गावर सीएसएमटी – पनवेल दरम्यान धावतील.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री ३ वाजता सीएसएमटी येथून लोकल सुटेल, ही लोकल कल्याण येथे पहाटे ४.३० वाजता पोहचेल. तसेच मंगळवारी रात्री ३ वाजता कल्याणवरून लोकल सुटेल आणि ती सीएसएमटी येथे पहाटे ४.३० वाजता पोहचेल. तर, हार्बर मार्गावर पनवेल – सीएसएमटी विशेष लोकल पनवेल येथून मंगळवारी रात्री ३ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे  पहाटे ४.२० वाजता पोहोचेल.

हेही वाचा >>>विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश

निवडणूक पार पडल्यानंतर निवडणूक कर्मचारी आणि मतदारांना इच्छितस्थळी पोहचता यावे यासाठी बुधवारी रात्री विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहे. सीएसएमटी – कल्याण लोकल बुधवारी रात्री १.१० वाजता सीएसएमटीवरून सुटून कल्याण येथे रात्री २.४० वाजता पोहोचेल. सीएसएमटी – कल्याण विशेष लोकल सीएसएमटीवरून रात्री २.३० वाजता सुटेल आणि कल्याण येथे पहाटे ४.०० वाजता पोहोचेल. कल्याण – सीएसएमटी लोकल कल्याण येथून रात्री १ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे रात्री २.३० वाजता पोहोचेल. कल्याण – सीएसएमटी विशेष लोकल कल्याण येथून रात्री २ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे रात्री ३.३० वाजता पोहोचेल.

हेही वाचा >>>भायखळ्यातील प्रचारात विकासकामांचा लेखाजोखा

हार्बर मार्गावरील सीएसएमटी – पनवेल विशेष लोकल सीएसएमटीवरून १.४० वाजता सुटेल आणि पनवेल येथे रात्री ३ वाजता पोहोचेल. सीएसएमटी – पनवेल विशेष लोकल सीएसएमटी येथून रात्री २.५० वाजता सुटेल आणि पनवेल येथे पहाटे ४.१० वाजता पोहोचेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हार्बर मार्गावरील सीएसएमटी – पनवेल विशेष लोकल पनवेल येथून रात्री १ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे रात्री २.२० वाजता पोहोचेल. सीएसएमटी – पनवेल विशेष लोकल पनवेल येथून रात्री २.३० वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे रात्री ३.५० वाजता पोहोचेल. सीएसएमटी – कल्याण अप आणि डाऊन आणि सीएसएमटी – पनवेल अप आणि डाऊन या लोकल सर्व स्थानकांवर थांबतील. या विशेष लोकल सेवा निवडणूक कर्मचारी, मतदार आणि रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लाभदायी ठरतील. तसेच मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येईल, असा विश्वास मध्य रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.