scorecardresearch

अजय पूरकर, वैभव मांगले यांना भेटण्याची संधी ; ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये आज उपस्थिती

दादर नायगाव येथील ‘अपना बाजार’ला प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले दुपारी सव्वाबाराच्या सुमारास भेट देणार आहेत.

mumbai shopping festival
खरेदीचा उत्साह वाढवण्यासाठी अभिनेते अजय पूरकर आणि वैभव मांगले हे शनिवारी उपस्थिती दर्शवणार आहे.

मुंबई : खरेदीच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देणारा ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’ आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या महोत्सवात सहभागी दुकानांतून खरेदी करण्यासाठी फक्त दोन दिवस उरले असून खरेदीचा उत्साह वाढवण्यासाठी अभिनेते अजय पूरकर आणि वैभव मांगले हे शनिवारी उपस्थिती दर्शवणार आहे.

‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’अंतर्गत सहभागी झालेल्या आणि मासेखाऊंसाठी पर्वणी असलेल्या अंधेरी पश्चिमेकडील डी. एन. नगरमधील ‘नव चैतन्य’ रेस्टॉरन्टला दुपारी २ वाजता ‘पावनिखड’ चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेतून रसिकांची मने जिंकून घेणारे अभिनेते अजय पूरकर भेट देणार आहेत, तर दादर नायगाव येथील ‘अपना बाजार’ला प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले दुपारी सव्वाबाराच्या सुमारास भेट देणार आहेत. त्यामुळे खरेदीबरोबरच या दोन आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. 

 ‘वामन हरी पेठे’ प्रस्तुत, ‘एम. के. घारे ज्वेलर्स’च्या सहकार्याने आयोजित ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये बृहन्मुंबई परिसरातील गृहोपयोगी वस्तूंच्या दुकानांनी सहभाग घेतला असून या दुकानांतून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. ‘अपना बाजार’ हे या फेस्टिव्हलचे पॉवर्ड बाय पार्टनर असून ‘नवं चैतन्य’ हे गिफ्ट पार्टनर तर ‘केसरी टूर्स’ ट्रॅव्हल पार्टनर आहेत.

कसे सहभागी व्हाल

‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी असलेल्या दुकानांमध्ये ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दुकानदार देयकाबरोबर एक कूपन देतील. ‘अपना बाजार’मध्ये १ हजार रुपयांच्या खरेदीवर, तसेच दागिन्यांच्या ३ हजार रुपयांपेक्षा अधिक खरेदीवर एकच कूपन दिले जाईल. कूपन भरून ते दुकानातील ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे. अर्धवट माहिती भरलेले कूपन स्वीकारले जाणार नाही. ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये जमा होणाऱ्या कूपनमधून भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल. विजेत्यांची नावे ‘लोकसत्ता मुंबई’मधून प्रसिद्ध केली जातील. अटी लागू आहेत.

मुख्य प्रायोजक: – वामन हरी पेठे ज्वेलर्स

सहप्रायोजक: एम. के. घारे ज्वेलर्स

पॉवर्ड बाय: अपना बाजार

गिफ्ट पार्टनर: नवं चैतन्य

ट्रॅव्हल पार्टनर: केसरी टूर्स

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Opportunity to meet ajay purkar and vaibhav mangle zws

ताज्या बातम्या