भिवंडी ग्रामीणमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रविण सोनावणे यांचा शुक्रवारी सकाळी टॅंकरच्या घडकेत मृत्यू झाला. रात्रपाळीचे काम संपवून घरी परतत असताना मुंबई-नाशिक महामार्गावर माणकोली चौकीच्या परिसरामध्ये ही घटना घडली. टॅंकरखाली चिरडल्याने प्रविण सोनावणे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालक रामनिधी रामदेव मोर्या (३६) यास अटक केली आहे.