वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ठेकेदारांनो जरा वाचायला शिका म्हणत ‘जय भवानी’ घोषणेबाबत मोठा दावा केलाय. जय भवानी ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. याला दुजोरा देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या अधिकृत लेटर हेडवर भवानीचं चित्र असल्याचंही नमूद केलं.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने काही ऐतिहासिक तथ्यांचा उलगडा होणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ व शिवाजी महाराज हे नाते जुने आहे. “जय भवानी” ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. परळच्या दामोदर हॉल येथे बाबासाहेबांना भेटायला येणारे लोकं हे एकमेकांना ‘जय भवानी’ असं अभिवादन करत असत. त्याकाळी बाबासाहेबांच्या अधिकृत लेटर हेडवर भवानीचं चित्र असे.”

“ठेकेदारांनो जरा वाचायला शिका”

“डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहाच्या वेळी शिवाजी महाराज, महात्मा फुले व गांधीजींच्या प्रतिमा ठेवल्या होत्या. महाड सत्याग्रहाच्या वेळी दासगाव ते महाडपर्यंत निघालेल्या जमावाने “शिवाजी महाराज”, “राजमाता जिजाऊ” यांचा जयजयकार करायला सुरुवात केली होती. ठेकेदारांनो जरा वाचायला शिका,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

हेही वाचा : समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम? प्रकाश आंबेडकरांच्या प्रतिक्रियेवर अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बदलापूरला जय भवानी घोषणेचा वापर

प्रकाश आंबेडकर आज (२१ फेब्रुवारी) मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “अनेकांना जय भवानी घोषणेबाबत पूर्ण माहिती नाही. १९२७-३० च्या काळात जो महाडचा सत्याग्रह झाला त्याचा आधार काय, त्यात कोणत्या घोषणा देण्यात आल्या याची फक्त माहिती मी सार्वजनिक केली. महाडला सत्याग्रहाची तयारी सुरू झाली. तेव्हा १९२४ ला पहिली बैठक झाली. त्यानंतर बदलापूरला जय भवानीची घोषणा झाली. सर्वात आधी बाबासाहेब आंबेडकर यांनीच ही घोषणा दिली.”