Mumbai Breaking News Live Updates: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईच्या हद्दीतील पवई तलाव बुधवारी पहाटे ६ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला. या तलावातील प्रामुख्याने औद्योगिक वापर व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरण्यात येते. तर दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद निर्माण झाल्यामुळे मंत्रिमंडळाची उपसमिती गठित केली आहे. तेव्हा मुंबई, पुणे आणि नागपूरसह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल…
Live Updates
Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 18 June 2025
Khadakwasla Dam News: सावधान! जाधववाडी तलावातून अनियंत्रित विसर्गाची शक्यता; खडकवासला धरणातूनही दुपारी विसर्ग
जाधववाडी हा द्वारविरहीत तलाव ९५ टक्क्यांपर्यंत भरला असून सद्यस्थितीचा पाऊस आणि धरणातील येवा वाढल्यामुळे सुधा नदी (इंद्रायणी नदी) पात्रात कोणत्याही क्षणी जाधववाडी तलावातून अनियंत्रित विसर्ग चालू होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ...सविस्तर वाचा
सुकेशिनी तेलगोटेंनी निविदा न काढता ६५ लाखांचे कंत्राट दिले, अहवालात सत्य उघड
भंडारा येथे २०२१-२२ मध्ये सुकेशिनी तेलगोटे सहाय्यक आयुक्त असताना शासकीय वसतिगृहांसाठीच्या क्रीडांगण विकास योजनेत गैरप्रकार झाल्याची तक्रार रवींद्र कोटंबकर यांनी प्रादेशिक उपायुक्तांकडे २८ एप्रिल २०२५ रोजी केली होती. ...सविस्तर वाचा
बहुसदस्यीय प्रभाग पद्धती सत्ताधाऱ्यांच्या फायद्याची
पूर्वी वॉर्ड निहाय महापालिका निवडणुका होत असत. एक- दोन वस्त्यांचा एक वॉर्ड आणि त्यातील मर्यादित मतदार संख्या लक्षात घेता उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचणे शक्य होत असे. ...वाचा सविस्तर
५०१ इमारती धोकादायक; शहरातील पुनर्विकासामुळे धोकादायक इमारतींची संख्या गतवर्षीपेक्षा कमी
शहरातील पुनर्विकासामुळे धोकादायक इमारतींच्या संख्येत यंदा मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. मागील वर्षी पालिकेने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारतींची संख्या ५२७ होती. ...अधिक वाचा
शिक्षकांनी शासन आदेशाची अंत्ययात्रा काढली, पोलिसांनी कमालीची सक्रियता दाखवत लगेच….
प्रहार शिक्षक संघटनेच्या बेमुदत उपोषण आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शासनाच्या संच मान्यता शासन आदेशाची अंत्ययात्रा काढण्यात आली. ...सविस्तर बातमी
विमा कंपनीतून बोलत असल्याचे सांगत दोन लाखांची फसवणूक
विमा कंपनीचा हप्ता भरण्यात सवलत देण्याच्या बहाण्याने घाटकोपरमधील एका व्यवसायिकाला एकाने दोन लाख रुपयांना गंडा घातला. ...वाचा सविस्तर
एम. टेक. पदवीनंतर आयटी कंपनीत नोकरी, जुगारात २३ लाख गमावल्यावर निवडला चोरीचा मार्ग
एम. टेक. पदवीधराला धंतोली पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात अटक केली आहे. पदवीधर चोराने मोठ्या बंगल्यांना लक्ष करत अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या. ...अधिक वाचा
पेपर कपमधून चहा पिणे धोक्याचे? प्लास्टिक आवरण असलेल्या चहाच्या कागदी कपांवर बंदी…
कागदी कपमध्ये चहा आणि कॉफी पिणे धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सामान्यतः, कागदी कपमध्ये जलरोधक गुणधर्मांसाठी प्लास्टिकचा थर वापरला जातो. ...सविस्तर वाचा
हजारो नागरिक भूखंडाचे होणार मालक, मुख्यमंत्र्यांचे असे आहेत आदेश
रामनगर येथील लीजधारकांसाठी मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आठवडाभरात जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव सादर होणार आहे.
...वाचा सविस्तर
जाहीर केलेल्या तारखेनंतर चार दिवसांनी नोंदणी प्रक्रिया सुरू…मुंबई विद्यापीठाचा अजब कारभार…
प्रवेश प्रक्रियेच्या अर्ज नोंदणीच्या प्रक्रियेतच गोंधळ घातला जात असताना पुढे सुविधा व्यवस्थित मिळतील का, असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. वि ...सविस्तर बातमी
यवतमाळच्या नाट्यगृह उभारणीला दोन दशकांचा इतिहास, तरीही…
नाट्यगृहाभावी यवतमाळच्या सांस्कृतिक विकासाला खीळ बसली आहे. उत्तम नाटकं, मनोरंजनाचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम येथे होत नाहीत. ...वाचा सविस्तर
जादूटोणाच्या संशयातून वृध्दाची हत्या
शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय आसाराम कांबळे यांचा जादूटोण्याच्या संशयावरून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा/हेटी येथे घडली. ...सविस्तर वाचा
राजूर घाटात अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी
बुलढाणा मलकापूर राज्य मार्गावरील राजूर घाटात आज भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जन गंभीर जखमी झाले आहे. ...अधिक वाचा
नितीन गडकरी यांची महत्वाची घोषणा, फास्ट टॅगवर आधारित पास मिळणार
हा पास केवळ गैर व्यावसायिक खासगी वाहने (कार-जीप-व्हॅन आदी) यासाठी विशेष रुपात तयार करण्यात आला आहे. तो देशभरातील राष्ट्रीय महामार्गवर तो चालणार आहे. ...अधिक वाचा
हिंदी भाषा अनिवार्यतेच्या शासन निर्णयावर चौफेर टीका, चळवळीतर्फे निषेध
राज्य शासनाने इयत्ता १ ली ते ५ वीच्या शाळांमध्ये हिंदी ही तिसरी भाषा ठेवण्याचा निर्णय कायम ठेवत हिंदी सक्तीला तोंडी स्थगिती जाहीर केल्याचा फोलपणा समोर आला आहे.
...सविस्तर बातमी
पडद्यामागून येणाऱ्या सक्तीचा कडाडून निषेध… नेमकं काय अभिजात होतंय ? हिंदी भाषेच्या निर्णयावर अभिनेता हेमंत ढोमेचा संताप
‘राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४'नुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल. ...सविस्तर बातमी
तीन कोटींचे बक्षीस असलेला जहाल नक्षल नेता गजर्ला रवी चकमकीत ठार, चलपतीची पत्नी अरुणालाही कंठस्नान
सहा राज्यात 'मोस्ट वांटेड' असलेला जहाल नक्षल नेता तसेच नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य गजर्ला रवी उर्फ उदय याला ठार करण्यात आंध्रप्रदेश पोलिसांना यश आले आहे. ...सविस्तर बातमी
Video: पेंच व्याघ्रप्रकल्पात हे काय घडले! चक्क वाघिणीने बिबट्याच्या कानाखाली वाजवली…
पर्यटकांच्या उपस्थितीत घडलेल्या या घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, जंगलातील वाघ-बिबट्याच्या संघर्षाचे हे दुर्मिळ दृश्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
...सविस्तर वाचा
राज्यात पुन्हा एकदा ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद, मंत्रिमंडळाची उपसमिती गठित
पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ओबीसी लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्या तुलनेत ‘एसईबीसीं’ची संख्या कमी आहे. असे असतानाही या जिल्ह्यांत ओबीसींचे आरक्षण कमी करून ‘एसईबीसी’ला देण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. ...वाचा सविस्तर
कुपोषणावरील ‘टास्क फोर्स’चा खातेपालट; कशासाठी? जाणून घ्या…
आदिवासी भागांतील बालकांमधील कुपोषण आणि मातामृत्यू दर कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृतीदलाच्या प्रमुखपदी पुन्हा एकदा डॉ. दीपक सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
...सविस्तर बातमी
मुंबई पुणे नागपूर पाऊस ताज्या बातम्या