मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर, हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर, पश्चिम रेल्वे अंधेरी ते गोरेगाव अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे

कुठे : ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर 

tanker overturned, tanker overturned,
बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर परिसरात अल्कोहोलचा टँकर उलटला
traffic block, Mumbai-Pune Expressway,
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर उद्या दोन तासांचा वाहतूक ब्लॉक
lonavala bus fire marathi news, groom s bus catches fire pune marathi news
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वऱ्हाडाच्या बसला आग; ४२ प्रवासी सुखरुप
mumbai nashik highway, traffic route changes
मुंबई नाशिक महामार्गावर उद्या मोठे वाहतूक बदल

कधी : सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत

परिणाम : सीएसएमटी सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद  सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार असून  नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद लोकल सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

हार्बर मार्ग

कुठे : पनवेल-वाशी अप आणि डाऊन 

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ०४.०५ पर्यंत

परिणाम : पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/ बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहे. तसेच पनवेल येथून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा आणि

ठाणे येथून पनवेलकडे जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द  करण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे 

कुठे :  अंधेरी ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर

कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत परिणाम : ब्लॉक कालावधीत अंधेरी आणि गोरेगाव अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. राम मंदिर स्थानकात जलद लोकलसाठी फलाट उपलब्ध नसल्याने तेथे लोकल थांबणार नाही. तसेच ब्लॉकदरम्यान काही बोरिवली लोकल गोरेगाव स्थानकांपर्यंतच चालविण्यात येणार आहेत, तर काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.