मुंबई : घरी सोडण्याच्या बहाण्याने ६४ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर एकाने बलात्कार केल्याची घटना मानखुर्द येथे घडली आहे. आरोपीने महिलेला जबर मारहाण देखील केली आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. पीडित महिला मासे विक्रीचा व्यवसाय करते. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास ती घरी जात असताना रस्त्यात तिला उमेश ढोक (वय ३८) हा आरोपी भेटला. दुचाकीवरून घरी सोडण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला मानखुर्द महाराष्ट्र नगर येथील त्याच्या घरी नेले. या ठिकाणी आरोपीने तिला एका खोलीत डांबून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला जबर मारहाण करत पहाटे ५ च्या सुमारास घराबाहेर सोडले.

हेही वाचा… दादर येथे वसतिगृहात विद्यार्थाची आत्महत्या

हेही वाचा… संजय गांधी उद्यानातील आदिवासी, झोपडीवासीयांच्या पुनर्वसनासाठी मरोळमधील ९० एकर भूखंड?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गंभीर अवस्थेत असलेल्या महिलेला काही नागरिकांनी एका रुग्णालयात दाखल करत ट्रॉम्बे पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी महिलेला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. महिलेच्या जवाबवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत मंगळवारी या आरोपीला अटक केली.