मुंबई: मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तरी खातेवाटप आणि पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्याने सोमवारी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणासाठी मंत्र्यांना जिल्हे वाटून देण्यात आले आहेत. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये, चंद्रकांत पाटील पुण्यात तर रविंद्र चव्हाण ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करतील.

 वजनदार आणि मलईदार खात्यांसाठी अनेक मंत्री अडून बसल्याने खातेवाटपाचा घोळ कायम होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात मुख्य समारंभात ध्वजारोहण होईल. १८ मंत्र्यांकडे जिल्हे वाटून देण्यात आले आहे.

अन्य मंत्री व जिल्हे

चंद्रकांत पाटील (पुणे), सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर), राधाकृष्ण विखे-पाटील (नगर), गिरीश महाजन (नाशिक), दादा भुसे (धुळे), गुलाबराव पाटील (जळगाव), रविंद्र चव्हाण (ठाणे), मंगलप्रभात लोढा (मुंबई उपनगर), दीपक केसरकर (सिंधुदुर्ग), उदय सामंत (रत्नागिरी), अतुल सावे (परभणी ), संदीपान भूमरे (औरंगाबाद), सुरेश खाडे (सांगली), विजयकुमार गावित (नंदुरबार), तानाजी सावंत (उस्मानाबाद), शंभूराज देसाई (सातारा), अब्दुल सत्तार (जालना):, संजय राठोड (यवतमाळ). अन्य जिल्ह्यांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडावंदन होईल.